कांहींच मी नव्हे ऐसे
1642.
कांहींच मी नव्हे ऐसे जरी केले ।तरि का जन्मविले पांडुरंगा ॥१॥
काय ब्रह्मज्ञान सांगशील माते ।खातया न खाते न देखेचि ॥२॥
यातिहीन शिंपी अधिकारी कैंचा ।हा धर्म तयाचा सांग त्यासी ॥३॥
चतुर्थ आश्रमी यति दिगंबर ।अशक्त संसार सोसवेना ॥४॥
तुझी सेवा सुरवर नेणता प्रेमगोडी ।झाली देशधडी वांयांवीण ॥५॥
नामा म्हणे हरि सखा चिंतामणि । मूर्ख समजावणी न करावी ॥६॥
