निर्गुणपणाच्या घेसी
1646.
निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना | तुज नारायणा शोधी नामी ॥१॥
काय तुझी भीड धरावी म्या आता | कृपाळु अनंता म्हणे ना मी ॥२॥
पुंडलिकासाठी उभा राहिलासी | ठकडा तू होसी म्हणे ना मी ॥३॥
नामा म्हणे नको मज चाळवण | लवकरी चरण दावींना का ॥४॥
