मुळींच मी जाणे तुझा
1648.
मुळींच मी जाणे तुझा ठेंगेपणा काय नारायणा बोलसील ॥१॥
पुरे पुरे आता तुमचे आचार | मजशी वेव्हार घालू नको ॥२॥
लालुचाईसाठी मागे भाजीपाना | लाज नारायणा तुज नाही ॥३॥
नामा म्हणे काय सांगो तुझी कीर्ती वाउगी फजिती करू तुज ॥४॥