भानुदासाच्या कुळी मह
1571.
भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार ।
आदि क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥
ओवाळू आरती स्वामी एकनाथा ।
तुमचे नाम घेता हरे भवभयचिंता ॥२॥
जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद ।
भागवती टीका नारायण् आत्मबोध ॥३॥
ब्रहमा विष्णु महेश ज्यासी छळवया येती ।
न ढळे ज्याची निष्ठा होशी एकात्मता भक्ति ॥४॥
कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे ।
अनन्यभक्तिभावे निळा बंदी त्याचे पाय ॥५॥
