जाणीव शाहणीव बाहियेल
1590.
जाणीव शाहणीव बाहियेले वोझे | तेणे चरण तुझ अंतरले ॥१॥
मज नेणतेंचि करी मज हरी | या लौकिकाबाहेरी काढी मज ॥२॥
तुझिया नामाचे मज लागो पिसे | देही देह न दिसे ऐसे करी ॥३॥
नामा म्हणे तुज जाणसी तरी येकचि जाण | रहित कारण कल्पनेचे ॥४॥
