देह जावो अथवा राहो |
1592.
देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा | तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
वदनी तुझे मंगळनाम | अखंड सदोदित प्रेम ॥३॥
जैसा तैसा असेल भाग | तैसा तैसा घडेल योग ॥४॥
नामा म्हणे केशवराजा | केला पण चालवी माझा ॥५॥