रात्रंदिवस खंती वाटे
1587.
रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवी | अनुदिनी आठवी चरण तुझे ॥१॥
ने रे पांडुरंगा आपुलिया गांवा | तू माझा विसावा जिवलग ॥२॥
मी येक येकट रंकाहूनि रंक | त्रिभुवननायक कीर्ति तुझी ॥३॥
मी तुझे पोसणे दास मे दुर्बळ | तू दीनदयाळ स्वामी माझा ॥४॥
तुझे भी अनाथ चरणी ठेवी माथा | सांभाळी सर्वथा ब्रीद तुझे ॥५॥
नामा म्हणे विठो जालो कासावीस | पुरवी माझी आस मायबापा ॥६॥
