पक्षिणी प्रभाते चारि
1586.
पक्षिणी प्रभाते चारियासी जाये | पिले वाट पाही उपवासी ॥१॥
तैसे माझे मन करी वो तुझी आस | चरण रात्रंदिवस चितितसे ॥२॥
तान्हे वत्स घरी बांधलेंसे दावा | तया हृदयी धांवा माउलीचा ॥३॥
नामा म्हणे केशवा तू माझा सोईरा | झर्णे मज अव्हेरा अनाथनाथा ॥४॥
