तुझिया चरणाचे तुटता
1597.
तुझिया चरणाचे तुटता अनुसंधान | जाती माझे प्राण तत्क्षणी ॥१॥
मग हे ब्रह्मज्ञान कोणापे सांगसी | विचारो मानसी केशिराजा ॥२॥
वदनी तुझे नाम होतांचि खंडणा | शतखंडरसना होइल माझी ॥३॥
सांवळे सुंदर रूप तुझे दृष्टी | न देखता उन्मळती नेत्र माझे ॥४॥
तुज परते साध्य आणिक साधन | साधक माझे मन होईल भ्रान्त ॥५॥
नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ | झणी माझा अंत पाहसी देवा ॥६॥
