संतांचे ठायी नाही द्
1571.
संतांचे ठायी नाही द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥
संताचें देणे अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड ते ॥२॥
संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥
एका जनार्दनी करी संतसेवा । परब्रह्मा ठेवा प्राप्त जाला ॥४॥
