देवा माझे मन करोनि स
1598.
देवा माझे मन करोनि स्वाधीन | निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥
फुकाचा कामारा वोळगे निरंतर | न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥
तुज नलगे देणे मज नलगे मागणे | असेन अनुसंधाने चरणाचेनि ॥३॥
नामा म्हणे केशवा तू सर्व जाणता | समयींच्या उचिता चुको नको ॥४॥
