काम क्रोध लोभ नाही स
1570.
काम क्रोध लोभ नाही संता अंगी । वर्तताती जगी जगरुप ॥१॥
नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायी ॥२॥
आणिकांची स्तुति नायकती कानी । न बोलती वचनी वाया बोला ॥३॥
एका जनार्दनी तेचि संत तारू । भवाचा सागरु उतरिती ॥४॥