वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३०. तुकाराम महाराजांची स्तुति

संत निळोबाराय (निळोब

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089101 · अभंग क्र. १५८४

1584.
संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति)
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ।
नमो सद्गुरु सच्चिदानंदरुपा ।
नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती ।
नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ॥१॥
तुझया आठवी वीसरे आपणाते ।
तरंगा जळी घालिता जेवि होते ॥
अळंकार सोनेचि होऊनि ठेला ।
निळा यापरी आठवी सद्गुरुला ॥२॥
तुका सद्गुरु हा तुका सद्गुरु हा ।
तुका नातुडे सच्चिदानंद तो हा ॥
जया मोहरा सर्व सिध्दात जाले ।
न तूके महामौन्य घेऊनि ठेले ॥३॥
जनी वीजनी वोळती हा तुकावा ।
करीता पुजा आणिती नित्य भावा ।
स्फुरद्रूप तो सर्व जाणोनि नेणे ।
पहा सांडिले सर्वसाक्षित्व जेणे ॥४॥
असदाग होणेंचि नाही जयाते ।
सदत्वासि कैंसेनि येणे तयाते ॥
जडत्वासि जो नातळे चित्प्रकाशे ।
चिदाभास तो बोलिजे त्यासि कैसे ॥५॥
नव्हे दु:ख आनंद त्याते म्हणावे ।
आनंदासि आनंदता केवि पावे ॥
नये देखता बूबळे आपणासी ।
निळा यापरी आठवी सद्गुरुसी ॥६॥
मनुष्याकृती राघवे ख्याति केली ।
शिळाशीखरे सागरी तारियेली ॥
तुकास्वामी हा पूर्णब्रम्ह प्रकाशी ।
जळी रक्षिले निर्जिवा कागदासी ॥७॥
महाराज हा जन्मला मृत्युलोकी ।
दुजी ऊपमा नाढळे ईहलोकी ॥
भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे ।
अनाथा दिनाकारणे तूकयाने ॥८॥
तुका हा तुका हा परब्रम्हरुपी ।
तुकीता तुका हा परब्रम्हरुपी ।
तुकीता तुका हा तूकला सत्स्वरुपी ॥
तुकास्वामीते नाम वाचेसि गाता ।
बहूसा निळा हा पावला वर्म हाता ॥९॥
असे जो सदा नित्य एकांतवासी ।
असे जो सदा सर्वदाही उदासी ।
असे जो सदा भोगत्यागे विरागी ।
असे जो सदा रंगला अंतरंगी ॥१०॥
तयाचे पदी रंगले चित्त माझे ।
सुखा पावले सच्चिदानंद भोजे ।
म्हणोनि निळा चिंतनी तोचि चिंती ।
सखा सोयरा सद्गुरु तोचि अंती ॥११॥
असे जो सदा देखण्याही निराळा ।
न लक्षेचि लक्षा जिवाचा जिव्हाळा ॥
नये जो कदा देखता ऐकतांही ।
असे जो सदा दिव्य देही विदेही ॥१२॥
नये जो कदा स्पर्शता कवळितांही ।
नये जो कदा देखता ऐकतांही ॥
नव्हे जो कदा एकदेशी विदेशी ।
अलक्षी निळा लक्षितो नित्य त्याशी ॥१३॥
अशिर्वांद देता कदाही न भागे ।
करी सत्य वाक्या न चूके प्रसंगे ।
अशा अर्चिता सद्गुरु तूक्याला ।
निळा चिंतिले तेचि पावोनि ठेला ॥१४॥
असे सर्वव्यापी सदा सर्वदांही ।
नसे नाम ना रुपही ज्यासि काही ।
असे जो सदा व्याप्यव्याप्या निराळा ।
तयाचे पदी रुळतो नित्य नीळा ॥१५॥
न देखे रवी अंधकारासि जैसा ।
कदा बंधना न देखे मुक्त तैसा ॥१६॥
तुका भासला मानवी वेषधारी ।
परी हा लिलाविग्रही निर्विकारी ॥
स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा ।
तुका तेचि तो हा परब्रम्ह ठेवा ॥१७॥
असोति नसे सर्वदा देहमेही ।
नसोनि असे सतूस्वरुपींच पाही ।
न लक्षेचि कोणा लिलाविग्रहीसा ।
दिसोनि जळी वेगळा भानु जैसा ॥१८॥
निळा पावला थोर पुण्ये तयासी ।
मनी चिंतिता सद्गुरु तूक्यासी ।
महालाभ आलभ्य तो प्राप्त जाला ।
पदी लागता तोचि होऊनि ठेला ॥१९॥
नमो सद्गुरु स्वामीया तूक्यासी ।
असे बोलता बोलण्यासीच ग्रासीव
असे शब्दव्यापी तोचि त्या शब्दाव्यापी तोचि त्या शब्दवीता ।
परी नाकळे शब्द त्याही अतौता ॥२०॥
असे व्यापुनि सर्वदा व्योम सर्वा ।
परी नाढळे स्पर्शनी स्पर्शभावा ।
तसा हा तुका तूकिता तूकवेना ।
लिलाग्रिही तो कदा ही कळेना ॥२१॥
असोनी जिवी जीवमात्रा निराळा ।
घटी ब्रिबला जेवि जो अंतराळा ।
असे व्यापुनी वेगळे व्योम जैसे ।
असे सद्गुरु स्वामीचे रुप तैसे ॥२२॥
दिसे दर्पर्णी दर्पणाते न शीवे ।
असे वेगळेचि अलिप्त स्वभावे ।
जैसे स्वप्नही भासुनी सत्य नोहे ।
तसे दृश्य मिथ्याच तो सत्य आहे ॥२३॥
निजानंद आनंदवीतो मनाला ।
मनी तोचि तो भासतो लोचनाला ॥
तयावीण हे रिक्त नाहीच कोठे ।
दिसे सर्व जे त्यातरी तोचि भेटे ॥२४॥
असे दृश्य अदृश्य त्याही परौता ।
जिवी जीवनाहूनी या जीववीता ॥
नव्हे त्याविणं सर्व काहीच ऐसा ।
मृगांबु रवी भासवी मिथ्य जैसा ॥२५॥
लिलाकौतुकी सर्व होऊनि ठेला ।
नसे वेचला ना गुणत्वासि आला ॥
जयालागि होणे न होणे असेना ।
जरी दावितो आपणलागि नाना ॥२६॥
असे देखता दीसतो तोचि अंगे ।
लिलानाटकी सर्व घेवोनि सोंगे ॥
नेहोनी कदा सर्वही तोचि जाला ।
परी आपआपी सवरुपींच ठेला ॥२७॥
दिसे दृश्यअदृश्य त्याही निराळस ।
क्षराअक्षरातीत जो का स्वलीळा ।
असंभाव्य होऊनि काहीच नोहे ।
नहोनी सदा सर्वदा तोचि आहे ॥२८॥
अनेका घटी दाउनी आत्मबिंबा ।
परी जेथिचा तेथ भानु स्वयंभा ॥
नसे स्पर्शला फांकला तो कदांही ।
तसा सद्गुरु भासला सर्व देही ॥२९॥
घटा भंगल्या भंगले बिंब नाही ।
असे जेथिचे तेथ् निश्चींत पाही ॥
तसा सद्गुरु सर्व व्यापूनि ठेला ॥
परी नातळे व्यापिले तया निराळा ॥३०॥
असे भानु व्योमी प्रभा फांकलीसे ।
परी भिन्न नोहूनि बिंबी विलासे ॥
तसा सद्गुरु जात ना येत नाही ।
असे जेथिचा तेथ सर्वत्र पाही ॥३१॥
नये ना कदा जाइना दूर कोठे ।
नसे ना असे आपआपींच दाटे ॥
अशा सद्गुरु नमो आत्मयाला ।
निळा वंदिता वंदनी तोचि जाला ॥३२॥
अरुपची हा सर्व व्यापला सर्व देही ।
परी देह वीदेहता सि नाही ॥
जगव्दंय हा वंदनाही निराळा ।
नसोनि असे सर्व दाऊनि लीला ॥३३॥
नसे नेणता नेणिवेमाजि कोठे ।
बहू जाणता जाणिवाहि न भेटे ॥
अशा सद्गुरुच्या पदा लागता हो ।
पदा देखोनी तोचि होऊनि राहो ॥३४॥
नसे रुप ज्या सर्वही तोचि जाला ।
नयोनि रुपा आपआपींच ठेला ।
॥ नसे ना असे व्याप्य ना एकदेशी ।
तया वंदिले सद्गुरु तूक्यासी ॥३५॥
अकस्मात येऊनि भेटि दीली ।
परी भेटण्यामाजि जाणीव नेली ॥
अशा जाणण्‍यानेण्याही निराळा ।
करुनि पदी स्थापिला नित्य नीळा ॥३६॥
कशी हे कृपा सद्गुरु तूकयाची ।
नुठेची कदा देहऊर्मी देहाची ।
मनी मन ही हारपोनीच गेले ।
पदा चिंतिता चित्त हीरोनि गेले ॥३७॥
नुठी बुध्दिचा अल्प उल्लेख तोही ।
अंत:कारणिचा शून्य संकल्प पाही ॥
निळा यापरी मुगध होऊनि ठेला ।
नेणो तूकया काय बोधूनि ठेला ॥३८॥
स्वये सत्य असत्य ते काय जाणे ।
जसा सूर्य अंधारलेशा न जाणे ।
तसा सद्गुरु न देखे दृश्यजाता निजानंदरुपी वसे तो सतंता ॥३९॥
न तूकेची जो तो म्हणे हा तुकावा ।
तुका नातुडे तो नये रुपनांवा ॥
कसे तूक घालु अरुपासि आता ।
नये लक्षिता बुध्दिजाता समस्ता ॥४०॥
न घालिता व्योम हे तागडी ही ।
जया तूकिता तूक दूजेंचि नाही ॥
नये भास्करा तूक काटाळ कोठे ।
तसा हा तुका साम्य दूजे न भेटे ॥४१॥
तुळे घालिता पृथ्वीये तूका साम्य दूजे न भेटे
तुळे घालिता पृथ्विये तूक नाही ।
दुजे मेरु मांदार सिंधूसि तेही ॥
तसा हा तुका तूकिता तूकवेना ।
नयेची साम्य दूजे दिसेना ॥४२॥
असा सद्गुरु भेटता लाभ कोटी ।
तया भेटल्यास स्वरुपींच गाठी ॥
कदा सद्गुरु व्दैतभावो दिसेना ।
असे अंतरी बाहेरी तो कळेना ॥४३॥
जेणे अचिले सद्गुरुच्या पदासी ।
वरी सौख्यसाम्राज्य येऊनि त्यासी ।
निळा अर्चुनी सद्गुरु तूकयाला ।
निजानंदबोधी स्वये तो विराला ॥४४॥
जया पूजिले आदरे पांडुरंगे ।
विमानस्थ केले प्रयाणप्रसंगे ॥
तनू मानवी दिव्यरुपीच केली ।
न त्यागी तिये दिव्यलोकासि नेली ॥४५॥
मनोभाव माझा तया पादपदमी ।
परी गूजसा राहिला तोयपमी ॥
निळा त्यापरी लीन तेथेचि झाला ।
पदी तूक्‍याच्या विरोनीच गेला ॥४६॥
स्वये दृश्यद्रष्टा निजांगेंचि जाला ।
हरीभक्त हा भेद गीळोनी ठेला ॥
नसे दीसते देखणे सत्य जेव्हा ।
निजानंदरुपींच वास्तव्य तेव्हा ॥४७॥
नसे एक ना दूसरे ज्यासी काही ।
निजानुभवी भेदु हा सत्य नाही ॥
स्वयेचि स्वये न देखे आपणासी ।
तया दूसरे ते न भासेंचि शेषी ॥४८॥
हरी सद्गुरुसी कदा भेद नाही ।
कवी बोलिले व्यासवाल्मीक तेही ॥
असा नित्य बोधू शुका नारदाला ।
विदेहीनृप येचि बोधी निवाला ॥४९॥
हरी सद्गुरु संतही ऐक्यभावे ।
जेणे लक्षिले आथिला तोचि दैवे ॥
आले स्वानूभवा तेहि तैसेचि जाले ।
निजानंदरुपी हरीसी मिळाले ॥५०॥
जगद्रूप हा सद्गुरु चित्प्रकाशे ।
दुजे नातळोनी अभासे निजांशें ॥
महद्-ब्रम्ह व्योमादिके तोचि जाला ।
अणूरेणुही मस्तकी तोचि ठेला ॥५१॥
जया रोमरंध्री बहु ब्रम्हगोळ ।
अणूमाजिं तो सांगरुपी कृपाळ ॥
समस्तांसि व्यापूनिया व्याप्य जाला ।
परी तो असे आपरुपी लपाला ॥५२॥
नसे एक ना दूसरे ज्यासि काही ।
नहोनी असे सर्वही सर्वदा ही ॥
जया रुप ना नामही सोसवेना ।
तया नाटके दाविले लोक नाना ॥५३॥
असा हा तुका कौतुकी आपरुपी ।
नसेना असे नातुडे वागजल्पी ॥
जया लक्षिता लक्ष मध्येंचि वीरे ।
बहु तर्क सिध्दात होती फरारे ॥५४॥
प्रकाशे जयाच्या दिसे सर्व काही ।
दिसे देखता तोचि होऊनि नाही ॥
असा नाटकी लाघवी सूत्रधारी ।
लिलाविग्रही पूर्णकामावतारी ॥५५॥
जेणे निर्मिले त्रिदशां ब्रम्हयासी ।
पदी स्थापिले कार्य सांगोनि त्यासी ॥
महर्षी ऋषी ज्याचिया नीजमत्ता ।
करीती सदा यज्त्रयागादि संस्था ॥५६॥
जेणे निर्मिले सर्व संकल्पमात्रे ।
विकल्पेंचि नेदी उरो त्या स्वतंत्रे ॥
जयाची मती नेणती देव तीन्ही ।
न लक्षे कदा त्यातरींही वसोनी ॥५७॥
दिसे दर्पणी ते असे वेगळेची ।
दिसे देखते होऊनि त्यासि तेची ॥
तसा हा तुका सर्व लक्षानिराळा ।
असे दाउनी देखता तोचि लीळा ॥५८॥
नव्हेची कदा वेगळा आपरुपा ।
रुपातीत हा न देखे आपआपा ॥
तयासी कसे नामरुपासि आणू ।
गुणातीत त्याचे कसे गुण वाणू ॥५९॥
अनूलक्षिता लक्ष जेथे पुरेना ।
नये जाणिवा जाणता जाणवेना ॥
अनुमानदृष्टांत नाही जयासी ।
प्रमाणासि कैसेनि आणू तयासी ॥६०॥
येथे सर्वदा मौन्य परादिकांचे ।
कळे रुप तकांतरा केवि त्याचे ॥
नये जाणिवा बुध्दिच्या जाणण्यासी ।
जया चिंतिता चित्त नूरेचि शेषों ॥६१॥
स्वलीळाचि हा रुपआरुपधारी ।
करी कौतुके नित्य जो निर्विकारी ॥
धरी वेष तोहीच नानापरींचे ।
परी वेगळा नातळे रुप त्याचे ॥६२॥
भवरोगिया नित्य आरोग्यकर्ता ।
असा हा प्रभू सर्व सामर्थ्यधर्ता ॥
जया ज्ञानवैराग्य सेवूनि राहे ।
महायश औदार्य ऐश्वर्य पाहे ॥६३॥
क्षमा लक्षुमी नित्य अंकीत ज्याची ।
पदा सेवुनी अर्चनी नित्य अर्ची ॥
जयाच्या रुपा देखतांची अनंगे ।
तनू जाळुनी पुत्र जाला निजांगे ॥६४॥
जेणे निर्मुनी कोटिब्रम्हांडमाळा ।
अलिप्तचि राहोनिया त्या निराळा ॥
कशी रोमरंध्रींच पाळी ढिसाळे ।
नव्हे पार ऐसी विशाळे भुगोळे ॥६५॥
असे रुपमंडीत पूर्णांश जैसा ।
चतुर्भज हा पाहिजे त्यासि तैसा ॥
करी वागवी मोहरी श्रृंग पावा ।
घन:श्याम हा लक्षि तू भक्तिभावा ॥६६॥
धरी मस्तकी मुकुटी मोरपीसा ।
असे कस्तुरी रेखिला भाळ तैसा ॥
वरी कुंडले शोभली दिव्य कर्णी ।
विराजे गळा कौस्तुभू सर्व लेणी ॥६७॥
असोनि असा दिव्यरुपी सदा हा ।
अरुपी लपेना ढळे भास तेव्हा ॥
असे भाविका सर्वदा सर्व देशी ।
नसे नास्तिका नास्तिवादेंचि त्यासी ॥६८॥
असे मच्छ हा कच्छ वराहरुपी ।
सिंह खुजा फर्शधारी प्रतापी ॥
धरी वीजयी चापपाणी विराजे ।
अनूजोपवेष्टीत वायोतनूजे ॥६९॥
जेणे सांडुनी भद्र सिंहासनासी ।
वनी शोधिले राक्षसांच्या मुळासी ॥
जेणे देवही बंदिचे मुक्त केले ।
महापातकी मुक्तिस्थानासि नेले ॥७०॥
तसाची व्रजी गोपवत्सांसि पाळी ।
करी गोपिका मेळवूनी धुमाळी ॥
स्वभक्तांसि पालूनि दृष्टी निपाती ।
असे बौध्यरुपी न बोलोनि अंती ॥७१॥
पुढे वंतू ।
कृतायुग धर्म प्रकाशील जेव्हा ।
कलीदोष वरुनिया सत्य तेव्हा ॥७२॥
जया चिंतिता चित्त चैतन्य होते ।
जया अर्चिता सर्व सामर्थ्य येते ॥
जया पाहरा पाहणे तोचि होये ।
जया ध्यासिता ध्येय ध्याता राहे ॥७३॥
तमूचि जसा दीपका सन्निधाने ।
प्रकाशेचि होऊनि राहे समाने ॥
नसे फेडणे नेसणे त्यासी काही
स्वत:सिध्द नेणे उपाधीस तेही ॥७४॥
स्वदेहीच ऊर्णी जसा तंतु काढी ।
तयासीच खेळोनिया शीघ्र मोडी ।
तसा स्वामी हा विश्वविस्तार होतो ।
पुन्हा आपणामाजि त्या सांठवितो ॥७५॥
जसा सूर्यहा व्योमिंचा व्योमिं राहो
प्रकाशे परी विश्व तो दाविताहे ॥
नियंता तसा सर्वदा आपरुपी ।
न भासोनी भासे तोचि तो सर्वव्यापी ॥७६॥
सुवर्णीच जाले अलंकार पाहे ।
परी आंतु बाहेरि सोनेचि राहे ॥
जसा पट तंतूचि होऊनि ठेला ।
तसा श्रीहरी विश्व न होनि ठेला ॥७७॥
जयालागिं दूजेपणाचा अभावो ।
कदापि नसे नामरुपासि ठावो ॥
तेणे आपणांमाजिं हे दाखवीले ।
बहू होउनी आपण रंजवीले ॥७८॥
नव्हे एक अनेक काहीच ऐसा ।
माये उपाधीक दावी तमाशा ॥
स्वये देखुनी देखता त्यासि रीझे ।
निजानंदरुपीच ऐसा विराजे ॥७९॥
विचित्राकृती मंडपीमाजिं चित्रे ।
बहू भासती दीपज्योति विचित्रे ।
परी ते दिसे दीपज्योतीच पाही ।
तसा एक आत्माचि हे विश्व नाही ॥८०॥
स्वत:सिध्दुची स्वामी माझा तुकावा ।
तुकातीत हा नातुळे रुपनावा ।
निळा नित्य सर्वातरी त्यासि पाहे ।
तया चिंतनी तोचि होऊनि राहे ॥८१॥
तमारी कधी अंधकारासी नेणे ।
स्वये स्वप्रकाशासि कैसेनि जाणे ।
तसा सद्गुरु देखे ना बंधनासि ।
स्वये मुक्त हे केवि मानेल त्यासी ॥८२॥
असे मुक्त तो सर्वासि देखे ।
जसे अमृते नेणिजे मृत्युदु:खे ॥
तसा ज्ञानिया दृश्य जे त्यासि नेणे ।
स्वये ज्ञानि मी हेहि कैसेनि जाणे ॥८३॥
दिसे भास आधीच तो सत्य नाही ।
तया होत जाते न भासे कदाही ।
असा हा तुका नित्य आनंदरुपी ।
असे नित्य तो नित्य आपस्वरुपी ॥८४॥
जया भेद हा नाढळे चित्प्रकाशे ।
अभेदी तया कोण आस्था विशेषे ।
नये एक आनेक देही मनासी ।
निजात्माचि मी हे नुरे भान त्यासी ॥८५॥
असे सर्वदा नित्य आनंदवासी ।
तया विषयी कोण गोडी विशेषी ।
चकोरे जसा चंद्र अमृत चाखे ।
तसा तो कदा पंकतोया न तोखे ॥८६॥
जेणे भोगिले सर्व ऐश्वर्य अंगे ।
तया दुर्भरत्वी कसे चित्त रंगे ।
जेणे संपत्ती त्यागिली निश्चयाची ।
तया कोण गोडी भिके जावयाची ॥८७॥
जयाचे घरी लक्षभांडार कोटी ।
करावी मजूरी केवि हे त्यासि ऊठी ।
तसा रातला जो निजात्मसुखासि ।
कसा तो रिझे क्षुल्लका भोगण्यासि ॥८८॥
जयाचे घरी नित्य कैवल्य नांदे ।
तया दु:खद्रारिदय कैची प्रमादे ।
जया जोडली संगती भास्कराची ।
तया घालणी केवि घाली तमाची ॥८९॥
जेणे सर्वसंगासि सोडोनि दीले ।
असंगासि चित्तासी बैसवीले ॥
तया भेदभ्रांतीस ठावोचि नाही ।
जनी वीजनी वर्तता सर्वदाही ॥९०॥
जणे सद्गुरु अर्चिला ज्ञानदाता ।
तया भ्रांतिचा नाढळे लेश आता ॥
जेणे अक्षयी भक्षिले अमृतासी ।
कदा मृत्युवार्ता न बाधी तयासी ॥९१॥
जया वैदयराजासी देखोनि जाती ।
महारोग ते औषधे केवि राहती ॥
जसा मारुती देखतांची पिशाच्या ।
घडे भंगणी अंतरी धाक त्याचा ॥९२॥
नव्हे सद्गुरु सन्मुख भेदु तैसा ।
तमारीपुढे लेश अंधारु जैसा ।
जनी वीजनी एक आत्माचि होये ।
तरंगा जसे व्यापुनी सिंधुतोय ॥९३॥
जशा सारुपा दिसती तोयगारा ।
परी त्या कदा होतिना भिन्न नीरा ॥
तसे सद्गुरुस्वामी हे संतमूर्ती ।
अनूकार ते सस्वरुपापुवृत्ती ॥९४॥
जसा कर्पुरु कर्दळीगर्भ होये ।
परी व्योमिचा व्योम होऊनि ठाये ॥
तसे हे जनी भासती जीवभेद ।
परी ते सदा सस्वरुपी अभेद ॥९५॥
पर्जन्यी असंख्यात वर्षती बिंदुधारा ।
परी एक वाचूनि कैचा पसारा ॥
जसे तोय ते तोयची आदि अंती ।
तसे चित्स्वरुपी जीव हे होती जाती ॥९६॥
जयालागिं तू धुडिसी जीव येथे ।
तरी धुंडिसी कासयालागिं तीथे ॥
घरी चुकले ठेवणे त्या विदेशी ।
कसे लाभसी चाळिता भूमिकेसी ॥९७॥
म्हणे दीपज्योती प्रकाशासि दावा ।
पुसे गूळ गोडी न जाणे स्वभावा ॥
जसे चोजवी व्योम स्थान रहाव्या ।
तसा लक्षिसी दूरी आत्मा पहाव्या ॥९८॥

अणूमात्र बीजी समग्रचि जैसा ।
लपाला वदूं काही नाहीच ऐसा ॥
जयी अंकुरेसी निघे बाहेरी तो ।
तयी नाकळे गगनचुंबीत जातो ॥११०॥
पुन्हा मोडिता बीजमात्रींच राहे ।
अव्यक्ती तसे विश्व नाहीचि होये ॥
तरी व्यक्त अव्यक्त हा चेतवीता ।
गुरुस्वामी हा सर्व सर्वा नियंता ॥११॥
जसा अग्न काष्ठी काष्ठ नेणेचि त्यासी ।
धरी उन्नती तोचि जाळी तयासी ॥
मग अग्नी ना काष्ठ होऊनि राहे ।
तसा सद्गुरु स्वामी हा वर्तताहे ॥१२॥
तयाचे पदी चित्त हे लीन जाले ।
नव्हे भिन्न त्या समरसी मिळाळे ॥
अकस्मात हा लाभ योजूनि आला ।
गुरु नीळयासी तुकोस्वामी जाला ॥१३॥
अनुष्ठान ते ते अहंतेसि मूळ ।
होऊनी पुढे मोह घालील जाळ ॥
बहुश्रूतता देउनी जाणिवेसी ।
नेदि आतळो सस्वरुपासुखसी ॥१४॥
बहूसाल ज्ञाने बहू जाणिवेचा ।
बहू स्फुंद होतो बहू मान्यतेचा ॥
कधी पावसी शांतिसूखासी आता ।
न देखोनि विश्वी त्रिदशांचा नियंता ॥१५॥
जयाचेनिया सर्व दिसे असे ही ।
जयाचेनि चळे ढळे सर्व काही ॥
असा अंतरीचा सखा नेणसी का ।
जयाचेनिया तूचि तू माजि नीका ॥१६॥
जेणे वीणस्तंभा धरीले नभासी ।
जळामस्तकी थावरीले महीसी ॥
जेणे चंद्रसूर्यादि नक्षत्रमाळा ।
नभी चालवील्या असंभाव्य लीळा ॥१७॥
जयाचेनि हे प्राणअपान देही ।
सदा वर्तती चाळिती इंद्रियांही ॥
जेणे न मिळे सोडिती त्याचि वेळा ।
नुलंघूनि आज्ञा गती त्याचि काळा ॥१८॥
असा सर्व सत्ताधिप त्रीजगाचा ।
त्रिदशाजना मानवा राक्षसाचा ॥
जयावीण हे न चळे आणूरेणू ।
निमिष्योनिमिष्या जयाचे प्रमाणू ॥१९॥
सदा सर्वरुपी सदा सर्वव्यापी ।
न शीवोन सर्वातरी पुण्यपापी ॥
जयामाजि तैसाचि होऊनि ठाके ।
अलिप्तपणे आपरुपींच थोके ॥ ॥२०॥
समग्रचि हा जेथिचा तेथ राहे ।
परी एक अंश जगा स्पर्शताहे ॥
जसा भानु हा व्योमिंचा व्योमस्थानी ।
वसोनी जगा स्पर्शतो रश्मिकीर्णी ॥२१॥
जळी हा स्थळी काष्टिं पाषाणि आहे ।
सदासर्वदा जेथिचा तेथ राहे ॥
कसा लाघवी हा कळासूत्रधारी ।
करी नाटके चाळि प्राचीनदोरी ॥२२॥
असे स्थावरी जंगमी सूक्ष्मदेही ।
असे पोकळीमाजि नमी मही ही ॥
जयावीण हे रिक्त कोठे असेना ।
तया नेणती भाविती लोक नाना ॥२३॥
विहारशययासनी भोजनी ही ।
वसे सवप्नतुर्यादिकाअंतरी ही ॥
अणूरेणुव्यापी नव्हे त्या परौता ।
असे सर्वदा सर्वही हा निरुता ॥२४॥
अविदयातरी हा सुविदयातरी ही ।
महदब्रम्ह व्यापूनि हा सस्यकींही ॥
वसे उत्तमादीक अंत्येज जाती ।
अनस्यूत हा जन्म जराक्षयाती ॥२५॥
बहु दाऊनी स्वर्गसंमारमाळा ।
जिवा भोग भोगवी प्राचीन वेळा ॥
जिही अर्चिले कर्म ज्या ज्या विलासे ।
तया नेमिले सुखदु:खासि तैसे ॥२६॥
असा हा जनी वीजनी सर्व दाता ।
तयासी भजे रे करी हेचि आता ॥
नको वीसरुं सर्वथाही तयासी ।
धरी अंतरी सद्गुरु तूकयासी ॥२७॥
बरा लाभ हातासि हा आजि आला ।
मनी सद्गुरु तूकया साठवीला ।
तयाचेनी भोजे निळा नाचताहे ।
तयाजनी भोजे निळा नाचताहे ।
जनी वीजनी तोचि सर्वत्र पाहे ॥२८॥
तया वेगळे आन काही दिसेला ।
जडोनि तया राहिला तो ढळेना ।
निळा स्वर्गसूखासि ही पात्र जाला ।
पदी तूकयाने तया ठाव दीला ॥२९॥
मनी चिंतिले आजि ते ते प्राप्त जाले ।
जुने ठेवणे हस्तकी सर्व दीले ।
असा हा तुका सर्वदानी उदारु ।
नुपेक्षी जयाचा करी अंगिकारु ॥३०॥
तया पाहिजे एक विश्वास गाठी ।
अनन्यासी तो सर्वथाही न लोटी ।
जया बोधिले त्या नुरे भ्रांतिलेशु ।
जनी वीजनी भेटवी त्या परेशु ॥३१॥
करी आपणासारिखे ज्यासि पाहे ।
चिदानंद बोधींच ठेऊनि राहे ।
म्हणोनि तुका हा करा साह्य आता ।
निळा निश्चयो सांगताहे समस्ता ॥३२॥
नर्का तूकयासी कदा भेद मानू ।
असे जीव जीवी सदा तो समानू ।
नभा व्यापुनी आणुरेणु प्रकाशे ।
असे व्यापुनी सर्वही तो निजांशे ॥३३॥
जया अर्चिती देव तेतीस कोटी ।
महर्षी ऋषी तापसी मेरुपाडी ।
महा साधनी योग जो का दुवाडे ।
तोहि साधिती योगि याचेचि चाडे ॥३४॥
नका साधने ही तुम्ही आड आणू ।
पहा सर्वसाक्षी निजात्मा सुजाणू ।
तया पाहता पाहणे तेचि होती ।
तया तोचि भासे नुरे देहस्फूर्ती ॥३५॥
न दीसेचि तो देहबुध्दी पहाता ।
अभेदी दिसे तोचि तुम्हा अतौता ।
नसे ना दिसे देखणे त्यासि दोन्ही ।
तरी तो पहा तोचि त्याते मिळोनी ॥३६॥
नुरे देखता दीसणे ज्यासि बाप्पा ।
तया सद्गुरु वोळला पूर्ण कृपा ।
जया सर्वथा जाणिवेचा विटाळू ।
तया भेटला सद्गुरु हा कृपाळू ॥३७॥
नुरे भेद अभेद ऐसाचि जाला ।
निजानंदरुपी सदा तो मुराला ॥
स्फुरद्रूप मी हेही नूठीच उर्मी ।
नव्हे सर्वसाक्षी निजात्मा निजात्मी ॥३८॥
तयाचे पदी नित्य कैवल्यरासी ।
पुढे तिष्ठती आणिमादीक दासी ॥
तेथे मुक्तिमोक्षासही कोण पूसे ।
जया सद्गुरु वोळला चित्प्रकाशे ॥३९॥
गुरु माऊली साउली हे अनाथा ।
स्नेहाळूपणे पूरवी सर्व आस्था ॥
आपत्या दिना पाजुनि प्रेमपान्हा ।
कशी रक्षिते अंगसंगी अभिन्ना ॥४०॥
जयाची क्रिया नित्य आनंदकारी ।
जयाची क्रिया सर्वदा निर्विकारी ॥
जयाची क्रिया आवडे पांडुरंगा ।
जयाची क्रिया भोगवी सौख्यभोगा ॥४१॥
जयाची क्रिया सत्यसंकल्प पाळी ।
जयाची क्रिया नित्य पर्वा दिवाळी ॥
जयाची क्रिया भाविका सौख्यदाती ।
जयाची क्रिया मान्य संनी महंती ॥४२॥
जयाची क्रिया अमृता जीववीती ।
जयाची क्रिया भास्करा भातिदाती ॥
जयाची क्रिया नीववीते मयंका ।
जयाची क्रिया सत्य बोधीत लोका ॥४३॥
जेणे भक्तिवीरक्तिज्ञानासि ठावो ।
करुनी बरा दाविला हा उपावो ॥
जेणे सत्यसनातनी वस्तु केली ।
अणूनि जना प्रत्यया दाखवीली ॥४४॥
असा हा तुका नित्य कैवल्यदानी ।
असे दावितो तत्ववाक्ये वदोनी ॥
जनी फेडिला देह संदेह माझा ।
नमो ऐसीया सद्गुरु स्वामीराजा ॥४५॥
जेणे रासक्रीडामिसे गोपिकासी ।
दिल सौख्य आलभ्य जे का महर्षी ॥
जयाचा नये लेश ब्रम्हादिकांते ।
तपी साधिता नातुडे शंकराते ॥४६॥
नव्हे काम तो भाग रतीसुखाचा ।
निजानंद तो वोपिला अंतरीचा ।
जयालागि शूकादिके धुंडिताती ।
सदा संतही अंतरी इच्छिताती ॥४७॥
तुका सद्गुरु सर्व भोगी विरागी ।
असे तेचि होउनी त्यातेचि भोगी ।
तया अर्चिती त्यासिही लाभ होतो ।
निळा सद्गुरु तूक्यासीच ध्यातो ॥४८॥
जयाचे मनी तोचि अध्यास लागे ।
स्वये होतस तोचि तैसा निजांगे ।
जसे कींटकी भुंगुटीलागिं जाले ।
तसे नीळया तूक्यानेंचि केले ॥४९॥
जया पूर्ण आस्था निजात्मा पहावा ।
तिही लक्षणी हातुका ओळखावा ।
जेणे पाहिले सद्गुरु तूकयासी ।
तेणे पाहिले सत्य नीजात्मयासी ॥५०॥
असे देहचतुष्टयाही निराळा ।
मना बुध्दिते नातळोनि स्वलीलीळा ।
तया पाहवे हेचि वाटे जयासी ।
तेणे पहावे सद्गुरु तूक्यासी ॥५१॥
जेणे देवव्दिजांसि संतुष्‍ट केले ।
जेणे यज्त्रयागादिका तोषवीले ।
विबूधादिका नित्य आनंद केला ।
नमो सद्गुरुच्या अशा त्या पदाला ॥५२॥
आशिर्वाद ज्याचा महालाभ देतो ।
निजात्मरुपा तत्क्षणी मेळवीतो ।
जेणे ठेविला मस्तकी हात पूरे ।
पळे मोह अंधार तो पैल मेर ॥५३॥
जेणे दीधले सौख्य ते नित्य वाढे ।
त्वरे तत्पदा भेटवी त्यासि कोडे ।
महानंद आनंद तो भोगवी त्या ।
जयाची कृपा पाववी सत्यसत्या ॥५४॥
जेणे पाहिले ज्यासि कारुण्यदृष्टी ।
तया दाविली आत्मरुपेंचि सृष्टि ।
पुन्हा त्या नुरे देहसंदेह काही ।
केले आपणासारिखे त्यासि पाही ॥५५॥
हदयावकाशें परेहूनि परते ।
असे व्योम जे शून्य त्याही अरौते ।
महाशून्य चिदांबरीचा आदित्यू ।
तया भेटवीताचि आत्मा सतंतु

जयाच्या प्रकाशा नसे पार लेखा ।
उदो अस्तु ना ग्रहणही सांज ऊखा ॥५६॥
तयाच्या प्रकाशा नसे पार लेखा ।
अदो अस्तु ना ग्रहणही सांज ऊखा ।
तया आत्मया सद्गुरु स्वामीयासी ।
नमस्कार माझा सदा तूकयासी ॥५७॥
जेणे बोधिला बोध मैळो शकेना ।
जेणे दीधला स्वानुभव तो टळेना ।
जेणे दीधला तोचि दृष्टीस राहे ।
निजात्माप्रकाशूचि सर्वत्र पाहे ॥५८॥
तया सद्गुरु स्वामीसी काय देऊ ।
उत्तीर्णासी काहिं न दीसे उपाऊ ।
मुळी पाहता मीहि माझे दिसेना ।
तया तोचि आता पदी मी अभिन्ना ॥५९॥
बरी स्नान संध्या करु देवपूजा ।
नसे यज्त्रयागादिकी भाव दूजा ।
बरा सद्गुरु सर्वरुपी विलासे ।
जयामाजि तैसाचि भासी अभासे ॥६०॥
जया आदि ना अंत कोठचि नाही ।
नसोनी असे सर्वदा सर्व देही ।
जया पाहता दृष्टि पूरा शकेना ।
अणूमाजिही लोक व्यापूनि नाना ॥६१॥
जेणे ऊटिला भानु मैळाचि नेणे ।
प्रकाशी जगाते स्वतजे स्वकीर्णे ।
जेणे ताविला अग्न हो तो निवेना ।
कदा उष्णता त्यागुनी तो वसेना ॥६२॥
जेणे जीवने भरिल्या तोयराशी ।
पुरोनी जगा ऊरला तो विशेषी ।
जेणे वोटिला मंडपू या नभाचा ।
नसे स्तंब ना जोर काहीच साचा ॥६३॥
जेणे अंतरिक्षाचि नक्षत्रमाळा ।
कशा लोंबवील्या करीती झळाळा ।
जेणे सोम हा अमृताचाचि अंशी ।
भरिल्या कळा नीववीतो जगासी ॥६४॥
जेणे हीमवंतु हिवाचाची केला ।
न तापेचि तो सीत होऊनि ठेला ।
जेणे पृथ्वियेसी क्षमत्वासी दिल्हे ।
जळामस्तकी आचळू स्थावरीले ॥६५॥
जेणे नीर हे काय पीळोनी केले ।
नसांडी उष्ण त्या अग्निसी काय दीले ॥
जेणे सूर्य प्रकाशिला कासयाने ।
न लक्षेची देवामहर्षीसि ध्याने ॥६६॥
असा स्वामी हा सर्वचातुर्यसिंधु ।
तया नेणती हे बुध्दिमंदु ॥
तया सद्गुरुच्या न लागोनी पाया ।
धाडिला जन्म केला अपाया ॥६७॥
पुढे जन्म असंख्यात व्याधी ।
असे मृत्यु हा नेणती पापबुध्दि ।
स्वये जन्मे घेवोनि यावे ।
पुढे यातनेलागिं सिध्दचि ॥६८॥
महा दु:ख ते मातरोदरपंकी ।
वसोनी नवमास नकी ॥
महादु:ख्‍ ते मातरोदरपंकी ।

वसोनी असावे नवमास नकी ॥
महादु:ख ते जन्मकाळी जिवाते ।
निर्गती नाचले युक्ति तेथे ॥६९॥
असे लक्षचौया शिचा होत फेरा ।
तरी नेणवे भाग्यमंदा गव्हा ।
तुका सद्गुरु सिध्द सांडोनि एैसे ।
भवे भोगिती निळा नवेचि कैसे ॥७०॥
जया सद्गुरु नीज वाक्याचिं सवे
स्वये तत्पदा जाऊनिया मिळावे ।
असा तो सखा दूरि नाहीच कोठे ।
जया पाहसि त्यातरी तोचि भेटो ॥७१॥
जया एक ना दूसरे स्थान नाही ।
सदा सर्वदा सर्व अंतर्वबाही ॥
अशा सद्गुरु तुकया शरण जा रे ।
होसि तूचि तू सर्वव्यापी तसारे ॥७२॥
न लागे तुते योगयाग वासवे ।
आहेसि जसा असोनि तेचि व्हावे ।
न लागे तुते भोगणे त्यागणेहि ।
न लागे दुरी गम्य देशांतराही ॥७३॥
असा सूगमु पंथ या तूकयाचा ।
नव्हेची कदा आदरु साधनाचा ॥
जयामाजि तैसेचि होऊनि जावे ।
तया बोधिता सर्व होईल ठावे ॥७४॥
नसे दक्षणा पूजनाचि अपेक्षा ।
जया सर्व पदार्थ जाति उपेक्षा ॥
न घेऊनि काहीच ऐश्वर्य देतो ।
स्वये आपणासारिखे त्या करीतो ॥७५॥
जयाच्या आनंदासि नाही समाप्ती ।
सदा सर्वदा डुल्लत जो अनार्ती ॥
जया एक मी दूसरे हे उरेना ।
जयामाजि तैसाच होऊनि नाना ॥७६॥
असे बैसला तेथुनी सर्व देशा ।
असे पूरला वायु सर्वत्र तैसा ॥
जया दूसरे भोग्य काही दिसेना ।
स्वये भोग्यभोक्ता ही देही असेला ॥७७॥
जया सद्रुरु पूर्ण कारुण्यदृष्टि ।
असे वोळला तोचि सभाग्य सृष्टी ॥
तया जन्मजन्मांतरा येत जाता ।
अशंकाचि नाही जसी स्वप्नवस्था ॥७८॥
तया होऊनि जन्म ठावाचि नाही ।
असे की नसे नाठवे हेहि काही ॥
जया येतजाता नसे जन्मखंती ।
असे तूचि आसे स्वरुनानुवृत्ती ॥७९॥
अशा सद्गुरुच्या कृपावैभवाने ।
वरीला जसा सूर्य प्रकाशकीर्णे ।
समाधान चित्ता सदासर्वदाही ।
तया काय व्हावे कदा भान नाहि ॥८०॥
स्वसुखासुखासी लिगटोनि ठेला ।
सदा अंतरी बाहेरी तो निवाला ॥
नेणे मस्यका आदि ब्रम्हदिकासी ।
समत्वचि पाहे न मानी विशेषी ॥८१॥
नव्हे इंद्रच्रद्रादिका लाग जेथे ।
तया पावला तत्पदालागिं तेथे ॥
जेथे जाणणे नेणणे हे असेना ।
तयामाजि तेचि दुजे ऊससेना ॥८२॥
नसे मीच येथे सर्व मिथ्यैव पाही ।
असे मीचि हे सर्व जाणोनि पाही ॥
असे निश्चये सद्गुरुचेनि मूखे ।
घरी एक पक्षास राही सवसूखे ॥८३॥
जरी सर्वही तूचि जालासि बापा ।
तरी भूतभेदा नयेची विकल्पा ॥
जरी नोहुनी काहीचि हेचि ठासी ।
तरी तू तया पावसी सत्सुखासी ॥८४॥
असे बोलिलो सद्गुरुच्या निरोपे ।
नसे चावळलो कदा वागजल्पे ॥
बरे अंतरी हे विचारुनि पाहे ।
असत्यासि रीझो नको सांग ते स्वर्गिचे नावडती ।
गुरुसेवनी त्या अनूराग चित्ती ॥९५॥
जिही मर्दिले कामक्रोधादिकासी ।
अहंभाव निर्दाळिला निश्चयेसी ॥
जिही व्देष्निंदेसिही नीवटीले ।
प्रतिष्टादि दंभादिका बोळवीले ॥९६॥
मनी एक तो ठेविला नित्य बोधु ।
जिही तोडिला सर्व आशासमंधु ॥
सदा दास्य या आर्चिले सद्गुरुचे ।
जिवी ध्याउनी सर्वदा रुप त्याचे ॥९७॥
गुरुचे पदी निश्चयो नित्या ज्याचा ।
तयाचे घरी दास मी सत्य साचा ॥
असे श्रीहरी गूज सांगे रमेसी ।
म्हणे मी वसे सर्वदा त्याचिपासी ॥९८॥
म्हणोनि निळा सद्गुरुच्या पदासी ।
जडोनीच ठेला नव्हे भिन्न त्यासी ॥
सदासर्वदा तूकयाचेचि ध्यान ।
नव्हे विसरु नाठवे देहभान ॥९९॥
असे दुरि जे का दिगंता परौते ।
तया चिंतिता तेचि हे चित्त होते ॥
म्हणोनि तुका सद्गुरु हाचि ध्यायी ।
तया पावसी सत्य याची उपायी ॥२००॥
जसा रावणे व्देषिला राम चित्ती ।
समरी स्वये राम झाला देहाती ॥
तसाचि स्वये कंसही कृष्ण जाला ।
मनी ध्यासिता तोचि होवोनि ठेला ॥१॥
जसी कीटकी भुंगृटीलागि पाही ।
भये चिंतिता तेचि जाली स्वदेही ॥
म्हणोनि भला हाचि अभ्यासयोगू ।
नसे घातु येथे करी लाभ चांगू ॥२॥
निळा पावला सद्गुरुतूकयासी ।
मनी निश्चये आठवीता तयासी ॥
वसे लोचनी मानसी तोचि आता ।
जिवी जाला नहोनी परौता ॥३॥
धरीता मनी वाक्य या सद्गुरुचे ।
निळा लाधला सौख्य त्याचे कृपेचे ॥
जनी वीजनी एक आत्माचि देखे ।
न मानी दुजे खंडज्ञाने न तोखे ॥४॥
बहू मतमतांतरे काय होये ।
थिता भाव तोही दुहावोनि जाये ।
तसे तर्कसिध्दांतही त्याचिपरी ।
जये साधने वाहवीताति दूरी ॥५॥
नव्हे अक्षरं घोकिता सौख्यलेशू ।
करी दंभ माना प्रतिष्ठे प्रवेशू ।
तपे मंत्रयत्रादि ऊपासनाही ।
बहु देखणी लोटिती ते प्रवाही ॥६॥
जरी आसने नित्य एकांतवासी ।
करी प्राण अपान नीरोधनासी ।
त्याजूनी रसा सेविती कंदमूळे
तरी आत्मप्राप्तीसी ते ते निराळे ॥७॥
तयालागिं त्यांचा नको वीट आला ।
मनी आठवू सद्गुरु तूकयाला ।
जयाचेनि वाक्ये तत्पदेसींच भेटी ।
न लागे कदा सांडिमांडी अटाटी ॥८॥
निळा जाणोनी एक त्याते न मानी ।
धरिले जिवी ऐकिले तेची कानी ।
जसे बोधिले सद्गुरु तूक्याने ।
असे सर्व मीचि त्यजी खंडज्ञाने ॥९॥
बरे तर्कवीतर्क ते दूर केले ।
कृपासागरे भेदभ्रांतीस नेले ।
निजात्मपदी स्थापिले नीळयासी ।
तुका सद्गुरु वोळलाही तयासी ॥१०॥
होते गौप्य ते गुह्य भांडार दीले ।
पदी बैसवूनि पदायोग्य केले ।
नव्हे वीसरु आठवू सत्य त्याचा ।
असा बोधिला बोध त्यासी सुखाचा ॥११॥
जया भोगिता तृप्तिसी भूक लागे ।
पहावेची वाटे पहाणे न भागे ।
असे सर्वदा तेचि कोंदोनि ठेले ।
असे अंतरी बाहेरी तेचि जाले ॥१२॥
नये सांगता रुप त्याचे कदाहि ।
कशासारिखे त्यासि दृष्टांत नाही ।
तया देखता तोचि व्हावे निजांगे ।
जसे रश्मिकीर्णचि ते सूर्य अंगे ॥१३॥
नसे भेद अभेद ते केवि दावू ।
जयालागि दूजेपणाचा अभावू ।
नव्हे जाण्‍ जे का स्वये आपणासी ।
तया दूसरे कोण जाणेल त्यासी ॥१४॥
असे आत बाहेरी त्याते न देखे ।
जशी शर्करा गोडियेते न चाखे ॥
तसे तोचि ते जाण ना नेण ऐसे ।
नसोनी असे तेचि होऊनि तैसे ॥१५॥
धरी नाम आनाम त्याची मिरासी ।
धरी रुप आरुप जो चिव्दिलासी ॥
धरी सर्व सामर्थ्य काही नहोनि ।
धरी लोक आनेक त्या नातळोनि ॥१६॥
दिस दाखवी जो निजांगे अकती ।
भरी कीर्तीचे पुंज सर्वा विवर्ता ॥
जेणे निर्मुनी लोकलोकातरासी ।
असोनी स्वये नित्य तोही उदासी ॥१७॥
जया पाहता नातळे लोचनाते ।
जया धुंडिता नाकळे जो मनाते ॥
नव्हे जो कदा दृश्य द्रष्टा निजांगे ।
जया नेणिेजे जाणिवेच्या प्रसंगे ॥१८॥
जया आवडे भक्ति ते भाविकांची ।
जया नावडे भक्ति ते भाविकांची ।
जया नावडे जाणिवा जाणिवेची ॥
नव्हे जो कदा साधनाही अपैता ॥१९॥
असा हा तुका सद्गुरुस्वामी माझा ।
जेणे कीर्तिच्या ऊमिल्या दिव्य भूजा ॥
जया लक्षिता दृष्टी ही त्या पुरेना ।
तरी पाहता तृप्तिही वोसरेना ॥२०॥
घन:श्याम हा नूतनू नित्य भासे ।
असे जो जिवी तोचि बाहेरि दीसे ॥
असे सर्वदा सर्वव्यापी अरुपी ।
स्वये स्फूर्तिते स्फूर्ति तोचि आरोपी ॥२१॥
असे दूरी ना अंतरी जोचि ऐसा ।
निळा चिंतोनी योजिला तोहि तैसा ।
तया सद्गुरुच्या नमो पादना ।
जसा भास्करी उत्सवु तोपधनया ॥२२॥
नमीता तया ठाव नूरेचि रीता ।
वसे अंतरी मीही तया अतौता ॥
निजांगे निळा तोचि होऊनि ठेला ।
तया आठवी तोचि होउुनि गेला ॥२३॥
नमीता नमण्यासि कोंठेंचि नाही ।
तया तोचि नहोनिया भिन्न काही ।
निळा की तुका भेद ऊरेल कैचा ।
तुका ना निळा आदि ना अंत याचा ॥२४॥
जया चिंतिता चित्त चैतन्य जाले ।
जया लक्षिता लक्ष लागोनि गेले ॥
जया ध्यासिता ध्यान ही मिचि जालो ।
पदा लागता पादपन्धीं विराला ॥२५॥
नये सांगता दाविता रुप त्याचे ।
नये ऊपमे तूकया तूक कैचे ॥
निघे शब्द तो शब्द त्याही अरौता ।
दिसे दृश्य अदृश्य त्याही परौता ॥२६॥
असा सद्गुरु हा तुकोस्वामी माझा ।
नसे साम्य ते पाहता त्यासि दूजा ॥
तयाचे पदी रंगला नित्य नीळा ।
तदाकारता पावला तो स्वलीळा ॥२७॥
असे शक्ति चक्राहुनी या परौता ।
स्वलीळाचि वर्ते करुनी अकर्ती ॥
जया नूमसे मी हे माझे कदाही ।
अरुपी रुपातीत तो सर्वदा ही ॥२८॥
निळा रक्षिला नित्य सेवानुवृत्ती ।
अशिर्वाद देऊनिया दिव्य स्फूर्ती ॥
हरीनाम गाऊनीया गूण वाचे ।
असे चिंतनी सदगरु तूकयाचे ॥२९॥
नये जाणता जाणण्याही निराळा ।
न दीसे कदा लक्षिता चर्मडोळा ॥
नये ऐकता देखता स्पश्रतांही ।
नसोनि असे सर्व अतर्यबाहयी ॥३०॥
असे व्यापुनी सर्व आकाश जैसे ।
परी नातळे स्पर्शले त्यासि तैसे ॥
असे नाहिंसा सर्व अंतर्यबाहयी
तसा सद्गुरु व्यापकू सवे काही ॥३१॥
नसे वणे व्यक्ती परी सुंदरु तो ।
बहू दाउनी रंजवी जीववी तो ॥
परी आपरुपा समानूचि राहे ।
अनूमान दृष्टांत तोही न साहे ॥३२॥
नव्हे रक्त ना श्वेत ही पीतवर्ण ।
हरी ततुं नव्हे जांबळा नीळ कृष्ण ॥
तया कासियसारिखे हो म्हणावे ।
अरुप रुपातित जो का स्वभावे ॥३३॥
नयेना कदा जाइना दूरी कोठे ।
जयामाजिं तैसाचि भासोनि भेटे ॥
असा सन्निधीं ना दिगंती दिसेना ।
असोनि नसे लोक व्यापूनि नाना ॥३४॥
नसे दर्पणी मूख दीसे खरेसे ।
खरे देखेना आपणालागिं जैसे ॥
तसे दृश्य दाऊनिया वेगळेची ।
न दीसे स्वये तेचि ते आपणासी ॥३५॥
स्वसंवेदय हेही असे बध्दगाठी ।
असे अमृतू अमृताते न घोटी ॥
स्वये अग्न तो जाळिना आपणाते ।
रवीते रवी न देखोनीच वर्ते ॥३६॥
खरे ते खरे नेणिजे ते अविदया ।
रिझेना असत्या ते जाणा सुविदया ॥
जसा नूगवे भानु त्या नांव राती ।
उदेला घडे दीवसूची गभस्ति ॥३७॥
नसे वंदिले सद्गुरुच्या पदासी ।
उणे काय अज्ञान अज्ञा नराशी ॥
असे जाणुनी आठवी नित्य त्याला ।
निळा चिंतनी चिंतितु तूकयाला ॥३८॥
गुरु बोलिजे ते गिरी पर्वतासी ।
लघू ते हळू भार नाही जयासी ॥
तसा हा नव्हे सद्गुरु स्वामी माझा ।
हळू जाडय नाही समाजी समाजा ॥३९॥
तयाचेनी बोधे निळा मग्न राहे ।
तयामाजिं तैसाची होऊनि पाहे ॥
जनी वीजनी तोचि देखे तयासी ।
निळाही तसा त्याचिया सामरसी ॥४०॥
नसे मी येथे सर्वही तोचि जाला ।
जयामाजिं तैसाचि होऊनि ठेला ॥
दिसे देखता तोचि त्याते निजागे ।
तयामाजि मी तोचि तेणे प्रसंगे ॥४१॥
न भावीतही जाणिवे तोचि येतो ।
न चिंती तरी चिंतनी तोचि राहतो ॥
असे मानसी चित्त चैतन्य प्राणी ।
रसस्वादनी लोचनी तोचि घ्राणी ॥४२॥
त्वचाश्रोत्रही तोचि होऊनि ठेला ।
जिवी जीव व्यापूनिही इंद्रियांला ॥
जसी क्षारता सिंधुतोयींच राहे ।
परी मेघमूखेंचि ते गोड होये ॥४३॥
प्रपंतू तसा सद्गुरुचेनि मूखे ।
परब्रहम बोधेचि होऊनि ठाके ॥
नसे मी असे तोची तो सर्व काही ।
घटत्व जसे मृत्तिकेमाजि नाही ॥४४॥
दिसे दृश्य ते दृश्य माझया विकल्पे ।
स्वये सत्य मी मिथ्य माया आरोपे ॥
माया उपाधीक शीवतव शीवा ।
अविदया उपाधीक जीवत्व जीवा ॥४५॥
मायाअविदयाउपाधिनिरासी ।
स्वत: सिध्द आत्माचि तो चिव्दिलासी ॥
जरी सर्व आत्माचि बोधसि आला ।
प्रपंचु तरी ऐक्यभावे निमाला ॥४६॥
म्हणे दृश्य द्रष्टा नव्हे मी निजांगे ।
असे मूळिंचा मूळ निर्मीत सोंगे ॥
घटाकाश जैसे मठाकाश भासे ।
उपाधी निमित्तचि ते भिन्न दीमे ॥४७॥
परी मुख्य आकाश ते तेचि पाही ।
उपाधिविनाशे न भंगेंची काहि ॥
अंळकार होऊनिया मुख्य सोने ।
नव्हे भिन्न त्या वीकता मोलमाने ॥४८॥
तसे विश्व हे एक आत्माचि जाला ।
तयामाजिं मी तोचि होऊनि ठेला ॥
म्हणोनी धरा पाय त्या सद्गुरुचे ।
मनी ध्याउनी स्वामीया तूकयाचे ॥४९॥
नव्हे आजिचा कालचा नूतनु मी ।
नसे रुप आरुप नामी अनामी ॥
असे ते नये दावितांही दिसेना ।
नये सांगता शब्द पूरो शकेना ॥५०॥
असे बोधिले सद्गुरुतुकयाने ।
निजानंद देऊनिया थोर माने ॥
निळा त्या सुखे तोचि होऊनी ठेला ।
पदी सद्गुरुचे विरोनीच गेला ॥५१॥
पुढारोनिया भक्त कारुण्यसिंधु ।
करे स्पर्शले मस्तका दीनबंधु ॥
तयाचाचि नेणो फळोददेश जाला ।
सबाह्यातरी तोचि कोंदोनि ठेला ॥५२॥
दिसे अंतरी बाहेरी सर्व तोचि ।
जनी वीजनी ठाव रीता नुरेची ॥
जिवी जीव जाला शिवी शीव जाला ।
देही देह होवोनिया तोचि ठेला ॥५३॥
अळंकार जैसे सुवर्णचि जाले ।
परी सांडुनी त्यासि नाहीच गेले ॥
तसा तोचि तो सर्व अतर्यबाहयी ।
निळा नामरुपासि ठावचि नाही ॥५४॥
उठी सागरी लाअ आनंत कोटी ।
परी जीवनूची तया पाठिपोटी ॥
तसा तोचि तो व्यापिता व्याप्य जाला ।
निळा आपणा भिन्न नाहीच केला ॥५५॥
मुळी तंतु एकचि आनंत पव्द ।
जरी भासले त्यातरी तोचि स्पटु ॥
जसी मृत्तिका तेचि पात्रे अमूपे ।
तसा तोचि तो मी वृथा आपरुपे ॥५६॥
असा नाटकी तोचि विस्तारलासे ।
जनी वीजनी तोचि होऊनि भासे ॥
बहु लोक आनंत ब्रहमांडमाळा ।
निजांश दाऊनिया तयानिराळा ॥५७॥
असा सर्वव्यापी परी त्या अनन्या ।
प्रत्यक्षचि फेडोनिया भ्रांतिदैन्या ॥
जसा चातकाकलागिं आकाशबिंदू ।
मुखी वर्षोनि फेडि =तृरूाासमंधू ॥५८॥
जया देखता अंतरी आर्त जैसे ।
तयालागिं तैसेचि होणे निजांशे ॥
जसी व्याघ्रिणी स्नेहे वत्सासी पाळी ।
दुजे देखता भक्षूं धावे कराळी ॥५९॥
तया तो नसे आपुले की परावे ।
परी पावती लोक संकल्पभावे ॥
वरी प्रेमळा भेटि येऊनि देणे ।
तसे नास्तिका नाही ऐसेचि होणे ॥६०॥
दिसे दर्पणी मूख ज्याचे जसे त्यासि तैसेचि दावी ।
बरे वोखटे त्यासि तैसेचि भावी ॥६१॥
तसा जो जनी वीजनींही पहाता ।
जयालागिं तैसाचि ती विश्वभती ॥
तया देखिेले सत्य जे मानिताती ।
तिही देखिली दृश्यमायीक भ्रांती ॥६२॥
जसा भक्त प्रल्हाद अंकी धरावा ।
तेणेचि रुपे दैत्य चीरोनि घ्यावा ॥
असे भावना ज्यातरी त्यासि तैसा ।
उपाधीवरी स्फटिकभास जैसा ॥६३॥
महदब्रहम कोटी रोमरंध्रींच थारा ।
असा तो प्रभू आणुमाजी पसारा ॥
नये लक्षिता रुप कोणासी कैसे ।
विबुध्दादिका ब्रहमयाही न भासे ॥६४॥
न दिसे कदा तोचि सर्वत्र देखे ।
न ऐके तरी सर्वही तोचि ऐके ॥
नव्हे दृश्य अदृश्य तोचि सर्वासि भेटे ।
नये चाखता जेविता तोचि घोटे ॥६५॥
असे अंतरी काय त्यासी आणावे ।
न दीसेचि त्याते कसे जी पहावे ॥
नसे स्थान त्या भेटिसी कोठे जाऊ ।
न ये जाइना त्या भवंडू केवि ठेवू ॥६६॥
न बोलेचि त्याते कसे जी पहावे ॥
नसे स्थान त्या भेटिसी कोठे जाऊ ।
न ये जाइना त्या भवंडू केवि ठेवू ॥६६॥
न बोलेचि त्याते कसे बोलवावे ।
न लक्षेचि त्याते कसे ऐकवावे ॥
न पाहेचि त्याते कसे काय दावू ।
न घेची तया काय कैसेनि देऊ ॥६७॥
न जायेची त्याते कसे बोळवीजे ।
न खायेची त्याते कसे जेववीजे ॥
नसेना असे केवि त्याते पहावे ।
नसे अंग त्या काय म्या लेववावे ॥६८॥
न लक्षेचि घाला भुकेला कदाही ।
असे जागतू की निजेला स्वदेही ॥
घरी की दुरी कोण जाणेल कैसा ।
जुना की नवा नित्य अनित्य ऐसा ॥६९॥
असे निर्जिवू सजिवू हे कळेना ।
असे की नसे पाहतांही दिसेना ॥
उभा बैसला की निजेला न लक्षे ।
तया काय कीजेचि पक्षे अपेक्षे ॥७०॥
नये सागरा कोठेंही सांठवीता ।
नये व्योम हे न्यावया ठाव रीता ॥
नये थांवरीता मही आन ठायी ।
तसा आत्म राजूचि सर्वत्र पाही ॥७१॥
नलक्ष जया पाहता लोचनाते ।
नये ऐकता केवि ऐको तयाते ॥
नये स्पर्शता काय स्पर्शोनि घेऊ ।
नव्हे भिन्न त्या भेटिसी केवि जाऊ ॥७२॥
नव्हे जो कदा आपुला ना परावा ।
नसेना असे व्याप्य अव्याप्य जीवा ॥
जया भेद अभेद लागो शकेना ।
तया केवि घेऊ त्यागिता त्यागवेना ॥७३॥
नये त्यागिता ना धरीता कदाही ।
वसे सर्व व्यापूनिया सर्व ठायी ॥
असा हा तुका काय तूकूं तयासी ।
तुकातीत तो तोचि तूके तयासी ॥७४॥
निळा राहिला नित्य चिंतूनि त्याते ।
नसे विसरु तो निजांगचि वर्ते ॥
असे जो सदा दूसरे ग्रासुनिया ।
स्वये ग्रासुनी जो असे आपणींया ॥७५॥
नसे अंत ना पार ज्याच्या रुपाते ।
असे की नसे नाठवे हेही जयाते ॥
घरी की दुरी मी स्वदेशी विदेशी ।
कदा देखेना जन्ममृत्यूजरेसी ॥७६॥
असे वेचलो की नसे संचलो मी ।
न जाणे कदा कोठील कोण तो मी ॥
आलो मी पुढे जाइन हेहि नेणे ।
तया जाणती त्यासि तैसची होणे ॥७७॥
नुठी वृत्ति मी जाणता हेही ज्यासी ।
स्वये नेणता हेही नूरेची शेषी ॥
तोहि सद्गुरु तुक्यासी मिळाला ।
रवी कीर्ण तैसाचि होवोनी ठेला ॥७८॥
स्वये जाणण्यानेणण्यातील जाला ।
अकस्मात तैसाचि होऊनि ठेला ॥
जसा शर्करे गोडीयेसी समंधू ।
तरंगाजळा भिन्न नोव्हेचि सिंधू ॥७९॥
नव्हे भिन्न मी काय चिंतू तयासी ।
न्याहाळी कसा दर्पणु दर्पणासी ॥
जसा देखेना भास्करु भास्कराते ।
निळा तुकया चिंतिता तेवि होते ॥८०॥
तरी तोचि मी मीही तोचि स्वभावे ।
तरी वेगळे नूरिजे रुप नांदे ।
प्रभा भातु हे नांवेचि भिन्न जाली ।
परी ते सदा एक एकींच ठेली ॥८१॥
स्वये दृश्य द्रष्टाचि तो एक आंगे ।
जसी वामसव्ये निजांगी निजांगे ।
नव्हे नरनारायणा भेद काही ।
स्वये एकुची भिन्न दावूनी देही ॥८२॥
प्रभा भास्करु जेवि दोनी नहोनी ।
तसे सद्गुरु शिष्य ऐक्या मिळोनी ।
जगद्रूप जनार्दनू हा स्वभावे ।
स्वये तोचि तो दाउनी दोनी स्वरुपे ।

अळंकार भासे परी ते सुवर्ण ।
नये भिन्न दोनी स्वरुपे ।
अळंकार भासे परी ते सुवर्ण ।
नये भिन्न भेदातित एकवर्ण ॥८४॥
स्वये भास्करु जेवि नेणे तमाते ।
तमूही तसा देखेना भास्कराते ।
तसे संतही सद्रुपी ते अभिन्न ।
असत नोहती त्यातरी ही मिळोन ॥८५॥
जसी ते निशी भेटता भास्कराशी ।
तमा वीसरोनी मिळे त्या प्रकाशी ।
नुरे काळिमा लेश अंधार कोठे ।
स्वये होउनी तोचि त्यासीच भेटे ॥८६॥
कटुत्वासी सांडूनीया सेंद जैसी ।
परीपक्क ते पावली गोडियासी ।
जसा शर्करा इक्षूदंडूची जाला ।
स्वये नामरुपासी त्यागूनी ठेला ॥८७॥
निळाही तसा चिंतिता तूकयासी ।
स्वये तोचि जाला मिळोनी तयासी ।
जसे सिंधु तोयेची ते मीठ जाले ।
पुन्हा मीळता तोय होऊनी ठेले ॥८८॥
बहु चित्र दाऊनीया एकि भिंति ही मृत्तिकेचीच जाली ।
पुन्हा मृत्तिका भिंतिलोपे मिळाली ॥८९॥
तसा हा तुका दाउनी नामरुपे ।
स्वये आपणामाजिं आपस्वरुपे ।
निळा ही तुका व्दैकतभावा निरासी ।
स्वये मीळणी मीळती सामरसी ॥९०॥
जसा वन्हि मीळोनिया कर्पुराते ।
स्वये नूरवी आपणा ना तयाते ॥
तसे मीळता सद्गुरु तुकयासी ।
दुजे हारवूनी निजात्मेसि ग्रासी ॥९१॥
नव्हे कांहिंच त्यासि कैसे पहावे ।
उपाधीनिमित्तची त्या ओळखावे ॥
उपाधीनिरासी तेहि नाहीच होये ।
नये जाणता जाणिवेच्या उपाये ॥९२॥
म्हणोनी बरे ओळखा तूकयासी ।
असे अंतरी बाहेरी तो तुम्हासी ॥
न दीसे तरी तोचि तो सर्व आहे ।
तया लक्षूनी तोचि होऊनी राहे ॥९३॥
महा पंचभूता भौतिकाहि निराहा ।
असे चेष्टऊनी सर्व विचित्र लीला ॥
करी दाखवीहि परी तो अकर्ता ।
असे शाक्तत्रया निर्मुनी ही नियंता ॥९४॥
तया नेणता भोगिजे मूढ योनी ।
असंख्यात त्या दु:ख शोकाभिदानी ॥
तरी लागवेगे धरा पाय त्याचे ।
मनी चिंतुनी सद्गुरुतूकयाचे ॥९५॥
निळा सांगतो सर्वदा हेचि सर्वा ।
नका अंतरु या सुखानंददैवा ॥
जये वेचला तो क्षणू पूढती हा ।
हरुनी अयुष्या विटंबील देहा ॥९६॥
न मानी तया भोगणे ते न चूके ।
पुढे यातना योनिव्दारे अनेके ॥
न दीसे उपाव अशा दु:खजाती ।
हाति प्राप्त तेव्हा यातनाची अवर्ती ॥९७॥
निर्षिध्दचि त्या शुध्द कोणा म्हणावे ।
कसे विष्‍ ते अमृतासी तुकावे ॥
अधमींच तो केवि मीळे स्वधर्मी ।
महामूढ तो केवि पावेल आत्मा ॥९८॥
म्हणोनी असे निंदय ते ते त्यजावे ।
तया संगती संगदोषे लिपावे ॥
जरी जोडली संगती सज्जनाची ।
तरी पाविजे संपदा सत्सुखाची ॥९९॥
तरी आठवू पाय त्या सद्गुरुचे ।
जयाच्या कृपे पाविजे सौख्य साचे ॥
जेणे तोडिला मोहसंदेह फासा ।
दिला बोध चित्ता न मिळेचि ऐसा ॥३00॥
तया चिंतीता चित्त नाहीच होते ।
उरी ही पुढे ठेविना आठवाते
असा सर्व होऊनिया तोचि ठाके ।
नुरे आपणू नूरऊनी अनेके ॥१॥
असे आठवी नाठवी जो समानू ।
स्वये नूरऊनी ज्ञानअज्ञानभानू ॥
तयाच्या पदा वंदिताची स्वलीळा
तदाकारता पावला नित्य नीळा ॥२॥
प्रतीबिंब बिबांहुनी दूरिकैचे ।
अभासे परी तेचि स्वरुप त्याचे ॥
उपाधीच ते भास आभास दावी ।
सहस्त्रांघटी नातळोनी स्वभावी ॥३॥
जिये वस्तुचा गुणस्वभाव जैसा ।
अनादी असे तोचि आलोडु तैसा ॥
असे अंगिची साउली मिळा जैसी ।
नव्हे सारिता दूरि ज्याची तयासी ॥४॥
स्वभावे जयाचा तेचि अध्यात्म त्याचे ।
न सूटे जसे साकरे येचे ॥
सुगंधु जसा कस्तुरीते न सोडी ।
तसा हा तुका भ्रातिदैन्यासि फेडी ॥५॥
तसा इश्वरु नामरुपासि नेणे ।
प्रकाशी परी विश्वआभासि कीणे ॥
दिसावे जगे हा स्वभावोचि त्याचा ।
जसा दाहकू गुण हूताशनाचा ॥६॥
उदेला तसा होय मार्तंड तूका ।
जयाच्या प्रकाशे नुरेची अशंका ॥
करी आपणसारिखेची अनन्य ।
महाराज हा सद्गुरु धन्य धन्य ॥७॥
तयाचे पदी सर्व विश्रांत जोडो
मनी आठवीता महासौख्य वाढे ॥
ककसा पावला आतवीता त्वरेसी ।
विसावोनि ठेला हदयावकाशी ॥८॥
असो जाणता हा सखा अंतरीचा ।
कळे अंतर्गुह्यार्थ जैसा जयाचा ॥
करी पूर्ण राहोचि नेदी अशंका
न पूसे तरि देखता भाव नीका ॥९॥
मनी चिंतता मूर्ति या सदागुरुची ।
करी भाविका आपणासारिखेची ॥
तया भिन्न ते सर्वथा ऊरवीना ।
निजानंद भोगूनि राखे अभिन्ना ॥१०॥
दयाशांतिचा पूर्णसिंधूचि जैसा ।
भरोनी असे आर्तिकालागिं तैसा ॥
बरा देउनी बोध त्या अंतरीचा ।
निजानंदरुपींच रक्षीत साचा ॥११॥
पहा नीळयालागिं प्रसन्न जाला ।
अकस्मात येऊनिया बोध केला ॥
जसे सिध्द दत्तात्रये येउनीया ।
दिले तत्व जनार्दना बोधुनिया ॥१२॥
बअरा साधला सर्व हीतार्थ आता ।
तुकोस्वामीचा हा आशीर्वाद होता ॥
निजानंदसुखसिची पात्र केला ।
निहा सद्गुरुस्वामीनी गौरविला ॥१३॥
नेणो काय सुकृत होते निजाचे ।
होते जोडिले जन्मजन्मांतरींचे ॥
फळोदेश हे दयावया तेचि आले ।
तुकोस्वामीच्या दर्शना योग्य केले ॥१४॥
मी तो नेणते नेणता हीत काही ।
होतो वाहवीलो दु:ख चिंताप्रवाही ॥
उदासील होवोनिया जीव देता ।
अकसमात हा पातला प्राणदाता ॥१५॥
त्वरे येऊनीया समाधान केले ।
धरुनी करी हदया मेळवीले ॥
निज मसतकी हात ठेऊनि तेव्हा ।
कला तत्वबोधी क्षणेंचि रिघावा ॥१६॥
निजांकी निळा बैसवोनि कृपेने ।
नि:संदेह केला बहुता रितीने ॥
आशिर्वाद देवोनिया स्थापियेला ।
जनी वीजनी ऐक्यते पाववीला ॥१७॥
महासौख्य ते अंतरी गौप्य होते ।
प्रकाशून ते प्राप्त केले दिनाते ॥
निळा तेचि पावोनिया तृप्त जाला ।
गुरुस्वांमिनी तो पदी स्थापियेला ॥१८॥
स्तवीता तया न चले वैखरीचे ।
जया रुप ना नामही सत्य साचे ॥
अरुनचि हा प्रगटूनी स्वरुपा ।
निळा बोलिला पूर्ण प्रतापकृपा ॥१९॥
जयाची मती नेणती वेद चारी ।
बहु शास्त्र सिध्दांतही ऐल मेरी ॥
ऋषीही बहुमतमतांतरेंसी ।
पहाती परी नेणवे हा तयांसी ॥२०॥
महदभाग्य हे आजि ऊदीत जाले ।
गुरुस्वामीनी सत्कृपे क्षेम दीले ॥
बरा बोधुनी वोध चित्तासि केला ।
निळा संतजनाप्रति नीरवीला ॥२१॥
कृपाळूपणे सत्य कारुण्यसिंधु ।
निळा स्थापिला देउनी नित्य बोधु ॥
हदयस्थ त्या काय म्या वीनवावे ।
पदी स्थपिले काय उत्तीर्ण व्हावे ॥२२॥
पदी रंगलो सर्वदा सदगरुचे ।
महाराज या स्वामीया तूक्याचे ॥
जेणे नेत्र दिव्यांजने सोज्वळीले ।
रुपा आपुल्या देखण्या योग्य केले ॥२३॥
नये जो कदा दृश्यभावास्वरुपा ।
तेणे दाविले आपणालागि कृपा ॥
निळा भेटूनी तत्वसिध्दात दीला ।
पदी सथापुनिया पदा योग्य केला ॥२४॥
भवसागराचा सदा हा उतारु ।
करी पार ज्याचा करी अंगिकारु ॥
नेदी अंगअंगुष्ठ भीजोचि कोठे ।
महाकूशलू हा करी पार नेटे ॥२५॥
जयाचेनिया आत्मतत्वींच भेटी ।
जयाचेनिया ससवरुपेंचि पुष्टी ॥
जयाचेनिया मोहअंधार फीट ।
जयाचेनि हा कामसंकल्प तूटे ॥२६॥
मनी चिंतनी ध्याउनी तूकयासी ।
निळा नित्य नीमग्न जाला तयासि ॥
असा त्याचिये आठवींची विराला ।
अकसमात त्यातेचि पावोनि ठेला ॥२७॥
बहुनीजनिष्ठे अर्चुनी सद्गुरुसी ।
निळा हेचि प्रार्थूनि मागे तयासी ॥
म्हणे हदयी माझिये त्वा बसावे ।
सदा नामसंकीर्तनी प्रेम दयावे ॥२८॥
करुनी कृपा बोधुनी हेचि दिले ।
होते अंतरी आर्त प्रविष्ठ जाले ॥
निळा ऐकता नीज वाक्या निवाला ।
पदा वंदुनीया सुखाचाचि जाला ॥२९॥
म्हणे धन्य हो धन्य स्वामी कृपाळा ।
नमो सद्गुरु दीनबंधू दयाळा ॥
करीतील जे नित्य अभ्यास त्याचा ।
मनोभाव सिध्दीसि न्यावा तयाचा ॥३०॥
दिले वाक्य ते सत्य सिध्दीस न्यावे ।
अनाथादिनालागि हे बोधवावे ॥
निळा नित्य प्रार्थूनिया हेचि मागे ।
किजे दान हेची की येणे प्रसंगे ॥३१॥
असे श्लोक संख्या त्रिशतबत्तिसांची ।
निजस्तूति हे सद्गुरुस्वामीयाची ॥
घडे नित्य आवर्तनु एक ज्यासी ।
करीती गुरु येउनी बोध त्यासी ॥३२॥

॥ श्रीसद्गुरुतुकारामार्पणमस्तु ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग