वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

तुझा विष्णुदास म्हणत

🙏 4. संत नामदेव · ABH-082471 · अभंग क्र. १५७२

1572.
तुझा विष्णुदास म्हणतात जगी | नाही माझे अंगी प्रेमभाव ॥१॥
तेणे थोर लाज वाटे पंढरिराया| ये माझ्या हृदया एक वेळा ॥२॥
द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायी | अनुभव नाही स्वरूपाचा ॥३॥
देखावेखी वैसे संतांचे संगती | नाही माझे चित्ती ध्यान तुझे ॥४॥
साकारले रूप ते दिसे चर्मचक्षु | परी नाही वोळखी केवळ मने ॥५॥
नामा म्हणे माझा उजळ करी माथा | भेटी देउनी संता निरवी मज ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग