वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २९. सदगुरु तुकाराम महाराजांचे वर्णन

दळणी कांडणी गाइन मंग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088545 · अभंग क्र. १५८१

1581.
दळणी कांडणी गाइन मंगळी ।
कान्हो वनमाळी प्राणसखा ॥१॥
हरीचिया नामे हरती महादोष ।
तुटती कर्मपाश निमिषमात्रे ॥२॥
सद्गुरुरायाची पाउले गोमटी ।
वंदितांची भेटे हदयस्थ ॥३॥
माझया सद्गुरुचे अवलोकिता मुख ।
समाधिचे सुख तुच्छ वाटे ॥४॥
सद्गुरुरायाचे स्वरुप पहाता ।
विश्वी एकात्मता भासो लागे ॥५॥
नित्य सद्गुरुची आळविता नामे ।
येती निजधामे भेटो सये ॥६॥
सद्गुरु स्वामीचा महिमा अगाध ।
वचनेंचि बोध करी शिष्या ॥७॥
सद्गुरु सद्गुरु करिता उच्चार ।
येती हरीहर भेटो सये ॥८॥
सद्गुरुच्या नामे पोट माझे धाय ।
आनंदाचा होय पाहुणेरु ॥९॥
निळा म्हणे माझया सद्गुरुची मूर्ति ।
सकळांही विश्रांति विश्रातीसी ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग