वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

प्रपंचरचना सर्वहि भो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088659 · अभंग क्र. १५७२

1572.
प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली ।
अनुतापाचे ज्वाळी देहबुध्दी हविली ।
वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली ।
अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥
जयजयाजी सदगुरुतुकया दातारा ।
तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥
हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ।
जगदोध्दारालागी उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥
तेरा दिवस बह्या रक्षूनिया उदकी ।
कोरडयाची काढूनी दाखविल्या शेखी ।
अपार कविताशक्ति मिरवुनि इहलोकी ।
कीर्तनश्रवणे तुमच्या उध्दरती जन लोकी जय ॥३॥
बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला ।
विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला ।
तेणे ब्रहमानंदे प्रेमा डोलविला ।
न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला ॥ जय ॥ ॥४॥
प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ।
कलिच्या काळामाजी अदभुत वर्तविले ।
मानवदेह घेऊनि निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ जय ॥ ॥५॥

संत निळोबाराय गाथा समाप्त.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग