बाळका स्तनपान करविते
1588.
बाळका स्तनपान करविते माता | टाळिता परता चरणी लोळे ॥१॥
हाती घेऊनि शिपटी माय लागे पाठी | चरणी घाली मिठी परते नोहे ॥२॥
तैसे माझे मन तुजलागी देवा | न विसंबे केशवा क्षणभरी ॥३॥
चातक तेथे पाणी तृषाकान्त वनी | वाट पाहे गगनी जीवनाची ॥४॥
निराळेंचि पीयुष वर्षे तयालागी | आळविता वेगी मेघराया ॥५॥
वाळले हे तृण नसंडी हो क्षीर | तैसे भक्ती स्थिर मन राहे ॥६॥
नामा म्हणे या जन्माचिया साठी | चरणी घाली मिठी परता नोहे ॥७॥
