सदगुरु तुकाराम महारा
1576.
सदगुरु तुकाराम महाराजांचे वर्णन
चाडियामुखे दाणा पडे ।
तरि तो निवडे कणभारे ॥१॥
तैसे कडवळ फोकिले नोव्हे ।
सोपटाचि राहे वाढोनिया ॥२॥
सद्गुरुमुखींचे वचन ।
पाववी निस्थानपदाते ॥३॥
वाचाळ ज्ञाने ऐकता गौष्टी ।
वाउग्याचि शेवटी भरोवरी ॥४॥
निळा म्हणे सांप्रदाय शुध्द ।
उपजवी बोध गुरु शिष्या ॥५॥
