जयाचेचि चरणी तीर्था
1590.
जयाचेचि चरणी तीर्था तीर्थपण । तो हृदयी केला सांठवण ॥१॥
नवल महिमा हरिदासाची । तीर्थे उपजती त्याचे कुशीं ॥२॥
काशीं मरणें होय मुक्ति । तेथे वचनें न मरता होय मुक्ति ॥३॥
एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगतीं दिठी ॥४॥