तुझे प्रेम माझ्या दा
1591.
तुझे प्रेम माझ्या दाखवी मनाते | मग तुझ्या चरणाते न विसंबे ॥१॥
कासया शिणविसी थोडिया कारणे | काय तुझे उणे होईल देवा ॥२॥
चातकाची तहान पुरवी जळधर | काय त्याची थोरी जाऊ पाहे ॥३॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहोळा | काय त्याच्या कळा न्यून होती ॥४॥
कूर्मी अवलोकी आपुलिया बाळा | काय तिच्या डोळा दृष्टि नासे ॥५॥
नामा म्हणे देवा तुझाचि भरंवसा | अनाथा कुंवसा होसी तूंचि ॥६॥
