अठ्ठाविस युगे उभा वि
1583.
अठ्ठाविस युगे उभा विटेवरी | मुद्रा अगोचरी लावूनिया ॥१॥
ध्यान विसर्जन केधवा करिसी | नेणवे कोणासी ब्रह्मादिका ॥२॥
पहाता तुजकडे माझे मीपण उडे | भेदाचे सांकडे हारपले ॥३॥
तुजपाशी असता मुकिजे जीवित्वा | ठकले तत्त्वता नेणो किती ॥४॥
नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे | मन पायी राहे ऐसे कीजे ॥५॥
