संसाराचे सोये चुकले
1570.
संसाराचे सोये चुकले बापुडे | केशव मार्गे पुढे सांभाळित ॥१॥
आळीकर नामे खेळे महाद्वारी | आंतून बाहेरी नवजे कांही ॥२॥
संतांसी देखोनी मिठी घाली चरणी | कुरवंडी करूनी देह टाकी ॥३॥
ऐसे निज बोधे राहिले निवांत | नामा एकुलते केशवचरणी ॥४॥
