दृष्टीविण देखणे रसने
1561.
दृष्टीविण देखणे रसनेविण चाखणे ।
शब्देंविण बोलणे ऐसे आहे ॥१॥
चरणेंविण चालणे निजकरोंविण घेणे ।
श्रवणेंविण ऐकणे तेथीचे गुज ॥२॥
चित्तेंविण चिंतणे बुध्दीविण जाणणे ।
मनेंविण अनुभवणे अनुभव्याते ॥३॥
निळा म्हणे गगने गगना आलिंगन ।
पवनासवे गमन पवना जेवी ॥४॥
