माझेचि मज नवल वाटे ।
1549.
माझेचि मज नवल वाटे ।
मीचि भेटे मजलागी ॥१॥
निजात्मबोधे उदो केला ।
प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥
कोठे कांहिंचि न दिसे दुजे ।
निजात्मतेजे जग भासे ॥३॥
निळा म्हणे अवघे ठायी ।
मीचि नाही दुजी परी ॥४॥
1549.
माझेचि मज नवल वाटे ।
मीचि भेटे मजलागी ॥१॥
निजात्मबोधे उदो केला ।
प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥
कोठे कांहिंचि न दिसे दुजे ।
निजात्मतेजे जग भासे ॥३॥
निळा म्हणे अवघे ठायी ।
मीचि नाही दुजी परी ॥४॥