वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

तू माय माउली म्हणोनि

🙏 4. संत नामदेव · ABH-082463 · अभंग क्र. १५५२

1552.
तू माय माउली म्हणोनि आस केली | विठ्ठले पाहिली वास तुझी ॥१॥
मज का मोकलिले कवणा निरविले | कठिण कैसे जाले हृदय तुझे ॥२॥
तुजविण जिवलग दुर्जे कोण होईल | ते माझे जाणेल जडभारी ॥३॥
मी दीन अपराधी तुझा सरणागत | तुजविण माझे हित करिल कोण ॥४॥
करुणा कल्लोळणी अमृत संजीवनी | चितितो निर्वाणी पाव वेगी ॥५॥
नामा म्हणे तुजविण जालो परदेशी केव्हा सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग