भवरोगियासी उपाय । धर
1548.
भवरोगियासी उपाय । धरावे ते संतपाय ॥१॥
तेणे तुटे जन्मजराकंद । वाया छंद मना नये ॥२॥
उपसना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥
निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥४॥
शरण एका जनार्दनी । धन्य धन्य संतजनी ॥५॥