भेटसी केधवा माझिया ज
1548.
भेटसी केधवा माझिया जिवलगा | ये गा पांडुरंगा मायबापा ॥१॥
चित्त निरंतरी तुझे महाद्वारी | अखंड पंढरी हृदयी वसे ॥२॥
श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी | तेथे माझी दृष्टी बैसली से ॥३॥
भेटिचे आरत उत्कंठित चित्त | तुजविण माझे हित कोण करी ॥४॥
कटी कर विटे समचरण साजिरे | देखावया झुरे मन माझे |॥५॥
असुर्वे दाटली उभारोनि वाहे | नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥
