मी माझे पाहता न देखे
1552.
मी माझे पाहता न देखेचि दिठी ।
आदि मध्य शेवटी विचारिता ॥१॥
टवाळ हे मिथ्या अविदयेचे भान ।
चेईलिया स्वप्न जैसे होय ॥२॥
मृगजळनदी आभासला पूर ।
न भिजे उखर कोरडेंचि ॥३॥
निळा म्हणे कांति दिसे ते वाउगी ।
वेगळा उरगी पासुनी त्या ॥४॥
