तू माझी जननी काय ग स
1550.
तू माझी जननी काय ग साजणी | विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥
डोळे माझे गिणले पाहता वाटोली | अवस्था दाटली हृदयामाजी ॥२॥
मी तुझे पाडस गुंतलो भवपाशी | माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज | क्षुधे पीडिलो मज विसरणी ॥४॥
तू माझी माउली मी तुझे बोरस पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥
नामा म्हणे विठ्ठले आम पुरवी माझी ओरसे वेळा पाजी प्रेमपान्हा ॥६॥
