निळोबाकृत चांगदेव चर
1567.
निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)
(प्रकरण. ३)
बरवी ही गुंतली आपुल्या वचने ।
निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥
विचारुनी ऐसे बोलिेले सकळ ।
वदवी अविकळ पशुमुखे ॥२॥
तुझा याचा आत्मा आहे एक जरी ।
वदवी ग्यान्या तरी येचि क्षणी ॥३॥
नाही तरी वृथा न करावी वल्गना ।
घेऊनिया पतना जावे स्थळा ॥४॥
हमणती ज्ञानदेव तुमच्याचि प्रसादे ।
करील घोष वेद म्हैसी पुत्र ॥५॥
कराल ते काय नव्हे धरामर ।
पाषाणी ईश्वचर प्रतिमे स्थापा ॥६॥
ग्रथत्रयामाजी सांगा जी निरुता ।
पढावा कोणता वेद येणे ॥७॥
ऐकोनि सकळ विस्मये बोलती ।
ऋग्वेदचि म्हणती पढवा यासी ॥८॥
देऊपि वरदान केली आज्ञा त्यासी ।
पशू प्रारंभासी करिता झाला ॥९॥
मुख्य प्रणवाच्चार काढियेला स्वर ।
देखोनि व्दिवर ठकावले ॥१०॥
लागली टकमक सांडले निज धैर्या ।
म्हणती गेलो वांया दुराभिमाने ॥११॥
संहिता पद क्रम उपन्यासे त्वरित ।
सूत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥१२॥
अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राम्हण ।
मांडिले अध्ययन जुगादीचे ॥१३॥
बोलियेला म्हैसा वेदाच्या सुस्वारी ।
हे सकळ व्दिजवरी देखियेले ॥१४॥
गळाले अभिमाने जाहले बिगलीतं ।
चरणी लोळत दीनपणे ॥१५॥
म्हणती हेचि देव तिन्ही मूर्तिमंत ।
मुक्ताई सादयंत परामाया ॥१६॥
नेणोनिया महिमा चावळनसे जी देवा ।
तो परिहार आता दयावा काय किती ॥१७॥
घडले जे अपराध ते ते करा क्षमा ।
अहो सिध्दोत्तमा विश्वसंदया ॥१८॥
अज्ञान गर्वित गेलो जी अभिमाने ।
बोलियेलो वचने अमर्यादे ॥१९॥
सर्वी सर्व तुम्ही सदा सर्वगत ।
कैचे प्रायश्चित नित्यमुक्ता ॥२०॥
निमित्ते करुनि करिता उध्दार ।
जडजीवा आधार चरण तुमचे ॥२१॥
विश्वाच्या उध्दारा तुमचे अवतरण ।
कराया स्थापन स्वधर्माचे ॥२२॥
कळलेती यावरी विधीचे जनिते ।
व्यापुनी सकळांते सगुणरुपी ॥२३॥
ऐशी करुनि स्तवने करिती दंडवत ।
आणि मागती आज्ञेते विनीतता ॥२४॥
घेऊनि निरोप जाती मंदिरासी ।
हमैसा देऊनि त्यासी पढीण म्हणू ॥२५॥
ऐकोनि अदभूत ऐसा चमत्कार ।
येती नारीनर नमस्कारा ॥२६॥
घरोघरी चर्चा स्त्रियाबाळे करिती ।
प्राणीमात्र वर्णितीत कीर्ति त्यांची ॥२७॥
मिळोनि परस्परे विप्र अनुवादती ।
योग्यता हे म्हणती नकळे त्यांची ॥२८॥
आणीकही एक नवल वितले ।
क्षेत्रींच्या देखिले सर्व जनी ॥२९॥
करिती विस्मयचर्चा तव येरे दिवसी ।
श्राध्द गृहस्थासी होते घरी ॥३०॥
तेणे त्या चौघांसी दिधले निमंत्रण ।
त्याचे पितृगण आणियेले ॥३१॥
देऊन भोजन केले स्वर्गवासी ।
सांगितली ऐशी मात तेणे ॥३२॥
ते सादर चांगदेवे ऐकीयेले श्रवणी ।
आणखीही ब्राम्हणी संनिधींच्या ॥३३॥
श्रवणेंचि सिध्दासी ताटस्थ्ा लागले ।
प्रश्नी वियारिले ज्योतिषमते ॥३४॥
तव ते सत्य ऐसे आले अनुमाना ।
विस्मये त्या नयना अश्रु आले ॥३५॥
म्हणे हे तो नव्हे तपाचे सामर्थ्य ।
होती मूर्तिमंत देवची ते ॥३६॥
अपूर्व हे वार्ता नवलचि ऐकिली ।
पूर्वी नाही झाली नव्हे पुढे ॥३७॥
अनुतापे झाला उव्दिग्न मानसी ।
पुसे ब्राम्हणासी पुढतोपुढती ॥३८॥
कोण त्यांचा ग्राम झाले किती दिवस ।
व्दिज म्हणे मास एक झाला ॥३९॥
इंद्रायणी तीरी आहे अलंकापूर ।
तेथे निरंतर वास्तव्य त्या ॥४०॥
पुसोनि ब्राम्हणा गेले निवासिया ।
म्हैसा घेऊनिया समागमे ॥४१॥
ऐकोनि चांग देवे शिष्य पाचारिले ।
आणि एकांतासी गेले सांगती त्या ॥४२॥
यावरी पूजन न करावे आमचे ।
सांगतो हे साचे धरा चित्ती ॥४३॥
तव ते विनविती होऊनि भयभीत ।
आज्ञा किंनिमित केली ऐसी ॥४४॥
आम्ही तो अज्ञान नेणो स्वामी सेवा ।
अपराध तो देवा कीजे क्षमा ॥४५॥
त्या म्हणती चांगदेव पूजेचे अधिकारी ।
आले महीवरी तेचि पूज्य ॥४६॥
जेवी सूर्यवंशी अवतरता राघव ।
राहिला भार्गव मागील मागे ॥४७॥
शिष्ट असता पूज्य न दयावी आपण ।
आहे प्रमाण वेदशास्त्री ॥४८॥
घडता अमर्यादा जावे पतनासी ।
भय हे मानसी बहुत वाटे ॥४९॥
शतमख करुनिया नहुष स्वर्गा गेला
परी अमर्यादे पावला सर्वत्व तो ॥५०॥
त्रिशंकू सगर ऐस सांगो किती ।
अमार्यादे येती पतनव्दारा ॥५१॥
तरी ते जूज्य प्रकट झाले मूर्तिमत ।
ऐकिले ते सांप्रत याचि काळे ॥५२॥
नव्हती ते मानवी देवाचे अवतार ।
निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेवो ॥५३॥
मुक्ताबाई आदिमाया हे जननी ।
केला प्रतिष्टानी कीर्तिघोष ॥५४॥
म्हैसीपुत्रामुखे बोलविल्या श्रुती ।
आश्चर्य हे चित्ती बहूत वाटे ॥५५॥
जावे भेटीलागी विचारले मनी ।
हे सिध्दी माधनी नव्हे कोणा ॥५६॥
अनुतापे झाला संतप्त मानसी ।
म्हणे सिध्दाईसी खेव आला ॥५७॥
तव बोलती प्रबुध्द त्यासीचि आणावे ।
अहो मूळ पाठवावे सिध्दराया ॥५८॥
सर्व सत्ता तुम्हा आहे जी स्वाधीन ।
राजे प्रजाजन आज्ञेमाजी ॥५९॥
तव म्हणती चांगदेव नव्हे हा विचार ।
आज्ञेचा बडिवार कोणा अंगी ॥६०॥
वंचूनिया काळा रक्षिले शरीर ।
बहुत दिस भार वाढविला ॥६१॥
परी हे सामर्थ्य नाही आम्हा अंगी ।
जावे भेटीलागी हेचि सत्य ॥६२॥
जन्माचे सार्थक सिध्दाचीये भेटी ।
होईल या तुटी संसारेसी ॥६३॥
परी सिध्दपणा येईल उणीव ।
काय कीजे जीव तळमळी ॥६४॥
ते म्हण्ती देवा हे नव्हे सत्य वार्ता ।
म्हैसी केवी वदता होईल वेदा ॥६५॥
आणि मृत स्वर्गवासी पितर कैसे येती ।
ते भोजने करुनि जाती हेही मिथ्या ॥६६॥
स्वामीसी विश्वास वाटे भलतीयाचा ।
परी हा नव्हे साचा वर्तमान ॥६७॥
नाही ये वार्तेसी साक्ष पडताळा ।
बोलियेला वाचाळ मिथ्या व्दिजा ॥६८॥
तया म्हणती चांगदेव प्रश्न म्या पाहिला ।
तोही उतरिला यथार्थ्पणे ॥६९॥
तो शिश्य म्हणती देवा प्रश्नही चुकतो ।
न सांपडता जातो वेळ काळ ॥७०॥
हे ऐकोनी तयांसी सिध्दद म्हणती तुम्ह मुर्ख ।
अरे विदया आहे चोख पढित माझाी ॥७१॥
तरि ते म्हणती जहारे प्रतिष्ठाना ।
आणि हे वर्तमान आणा यथातथ्य ॥७३॥
चिरंजीव सकळ क्षेत्रवासी व्दिजा ।
आशीवाद माझा लिहा पत्री ॥७४॥
नवल हे ऐकिले रेडा बोलविला ।
निगमाक्षरी केला घोष तेणे ॥७५॥
स्वर्गस्थ्ा पितर आणूनि जेवविले ।
पुनरपि बोळविले स्वर्गाप्रती ॥७६॥
साच की मिथ्या धाडावे लिहुनी ।
ते ऐकावया मनी उत्कंठीत ॥७७॥
सांगती शिष्यासी जाऊनी त्वरीत ।
यावे शिघ्रवत वरावरी ॥७८॥
चालिले तेथूनी सत्वचर ब्राम्हण ।
ते पावले पैठण गंगातीरा ॥७९॥
तीही ऐकोनी चांगदेवे पाठविले पत्र ।
मिळाले सर्वत्र क्षेत्रावासी ॥८०॥
धूतवस्त्रावरी गाधुमाचां राशी ।
मांडिले पत्रासी पूजा केली ॥८१॥
आलिंगिले पत्र कंठी दरी शिरी ।
वाचिले समग्री श्रवण केले ॥८२॥
कळला अभिप्रावो विस्मये दाटले ।
ते सिध्द आठवले बाळवेशी ॥८३॥
फुंदती गाळिती उभय नेत्री जीवन ।
म्हणती धन्य ईश तिन्ही ॥८४॥
पूर्वार्जिते होती उत्तम गोमटी ।
म्हणोनि ते दृष्टी देखियेले ॥८५॥
मग म्हणती सिध्दासी झाले हे उपश्रुत ।
नवल जे अदभुत वितले येथे ॥८६॥
दिव्यक्रीडा ऐसे संत आचरीत ।
दिगंता धावत वायावरी ॥८७॥
कैसी विस्तारिली आख्या दूरदेशी ।
आश्चर्य हेचि मानसी बहुत वाटे ॥८८॥
सन्मानुनी ब्राम्हणा दीधले भोजन ।
वस्त्रे पांघरवून गौरविले ॥८९॥
दिधली दक्षिणा मार्गी खर्चावया ।
पत्र लिहूनिया दिले हाती ॥९०॥
परात्परा सिध्दा गुरुसी नमन ।
पत्र अवलंबन केले स्वामी ॥९१॥
विदयार्थी ये आम्ही सर्वही ब्राम्हण ।
झालो सुखसंपन्न आशीर्वादे ॥९२॥
ऐकिले जे वार्ता सत्य विपली येथे ।
पढविले पशूने वेदघोषे ॥९३॥
गृहस्थाचे पितर आणुनी जेवविले ।
प्रत्यक्ष पाहिले आपण नेत्री ॥९४॥
निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान ।
वय तो लहान बाळवेषी ॥९५॥
करुनि ऐसी क्रीडा येथुनी स्वार झाले ।
नेवासिया गेले महासिध्द ॥९६॥
तया स्थळी केला भगवदीता अर्थ ।
दहा सहस्त्र ग्रंथ सिध्द झाला ॥९७॥
बाबाजीपंतांनी स्वहस्ते लिहिला ।
परी ओवीबध्द केला ज्ञानेश्वरी ॥९८॥
सच्चिदानंदबाबा ठेवियेले नांव ।
शिक्षापिला भाव देखोनिया ॥९९॥
एक पशु दुजा सच्चिदानंदबाबा ।
शिष्य केले नभा नकळती ॥१००॥
येथूनिया जाता अळंकापुरीसी ।
पशू आळियापाशी स्थापियेला ॥१॥
अजान वृक्ष तेथे ठेवियेली खूण ।
झाले निरुपण निवेदिले ॥२॥
घेऊनिया पत्र व्दिज आले तप्तीतीरा ।
नमिले वटेश्वरा चांगयासी ॥३॥
करुनि नमस्कार पत्र दिले हाती ।
नवलावो सांगती देखिले तो ॥४॥
म्हणती सत्य देवा अदभुत चरित्र ।
वर्णिती सर्वत्र तेथिचे जन ॥५॥
वाचिलीया पत्र म्हणती चांगदेव ।
वार्ता अभिनव नित्य नवी ॥६॥
विचारिता दिसे नव्हे सामान्य ।
गेला अभिमान गळोनिया ॥७॥
कायरे अतिक्रम करविला मज हाती ।
फिटली असती भ्रांती पाहोनि त्याते ॥८॥
आता तरी जावे म्हणती अलंकापुरा ।
सामग्रीया करा सिध्द वेगी ॥९॥
तव शिष्यजन सर्व गृहस्थ मिळाले ।
सकळी प्रार्थिले म्हणती देवा ॥१०॥
सिध्दाई कोणाची नाही स्थिरावत ।
तपाचे सामर्थ्य वेचलीया ॥११॥
आहे नाही आता त्याचे सिध्दपण ।
धाडा विचक्षण पाहोनि येती ॥१२॥
मग तैशासारिखा करावा विचार ।
येणे येरझार चुके देवा ॥१३॥
मग पाचारिले प्रौढ वृध्द तपोराशी ।
जा म्हणती तयांसी अलंकापुरा ॥१४॥
वसती सिध्द तेथे निवृत्ति ज्ञानेश्वर ।
सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥१५॥
सिध्दपण त्यांचे आहे की वेचले ।
ते पाहोनि यावे वहिले वेगावत ॥१६॥
ते म्हणती स्वामीया संताचे लक्षण ।
काय कैसी खूण सांगा आम्हा ॥१७॥
वर वेषा आम्ही पाहावे ते काय ।
अंतरीचे नव्हे विदयमान ॥१८॥
गृहस्थाश्रमी एक उदास दिसती ।
एक ते भासती व्यवसायीसे ॥१९॥
एक वेडे मुके पंगु मुद्राहीन ।
चतुर व्युत्पन्न दिसती एक ॥२०॥
देहाच्या संबंधे दिसे देहाकृती ।
अवस्थाही भोगिती यथाकाळे ॥२१॥
निद्रित निजेमाजी जागोचि जागृती ।
स्वप्न्रीहि देखती नानाविध ॥२२॥
इंद्रिया वर्तविती स्वभावव्यापारी ।
दिसती संसारी अतिदक्ष ॥२३॥
बाळक कौमार वृध्दाप्य तारुण्य ।
दिसती लौकिकासारखेची ॥२७॥
न चोजवे आम्हा संतांची निज खूण ।
सांगावे लक्षण तेचि पहो ॥२८॥
आंगे संत तोचि ओळखे संतासी ।
काय आणिकासी वर्म कळे ॥२९॥
म्हणती चांगदेव साच हे बोलिले ।
विचार न चले युक्ती तेथे ॥३०॥
कायरे करावे पूसती शिष्यांसी ।
ते म्हणती सिध्दासी दयावे पत्र ॥३१॥
लिहोनि पत्रिका दयावी यांचे हाती ।
देऊनि हे पाहती स्थित्यंतर ॥३२॥
पत्राच उत्तर काय देती कैसे ।
अर्थी अनायासे येईल कळो ॥३३॥
मग पत्र लिहावया बैसले एकांती ।
न चालेची युक्ति थोटावली ॥३४॥
अनामासी नाम अरुपाशी रुप ।
कैसे लावू पाप कल्पनेचे ॥३५॥
चिरंजीव म्हणो तरी विश्वात्मक ।
तीर्थरुप तरी बाळकदशा आंगी ॥३६॥
न दिसे पूर्वी न लभेचि अक्षर ।
पडियेला विचार न चले हात ॥३७॥
मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी ।
चित्ती चिंतवणी पैठी झाली ॥३८॥
देखोनि सकळ प्रार्थिती सिध्दासी ।
का हे दशा ऐसी विपरीत ॥३९॥
म्हणेती चांगदेवकाय रे लिहावे ।
मूळ न संभवे पत्रिकेचे ॥४०॥
तरी ते म्हणती देवा कोरे पत्र पुरे ।
दयावे अत्यादरे पाठवुनी ॥४१॥
युक्तीमाजी दिसे बरवा हा सिध्दात ।
सिध्दाईचा अर्थ गूढ गुह्य ॥४२॥
घालुनिया घडी कोरे पत्र देती ।
आणि उत्तर म्हणती मागा त्यासी ॥४३॥
जाऊनिया तुम्ही यावे शीघ्रवत ।
करा दंडवत क्षेम सांगा ॥४४॥
चालिले तेथुनी आले शिवपीठा ।
वास्तव्य वरिष्ठा सिध्दा जेथे ॥४५॥
यावरि म्हणे निळा पत्राचे उत्तर ।
देती ज्ञानेश्वर परिसावे ते ॥४६॥
अत्यंत रसाळ आहे निरुपण ।
पुढील प्रकरण कसोटीचे ॥४७॥
॥ इति चांगदेव चरित्रे पत्र प्रेषणंनाम तृतिय प्रकरणं ॥
