वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

भेटीची आवडी उत्कंठित

🙏 4. संत नामदेव · ABH-082478 · अभंग क्र. १५४७

1547.
भेटीची आवडी उत्कंठित चित्त | न राहे निवांत एके ठायी ॥१॥
जया देखे तथा हेंचि पुसे मात | का मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥
कृपेचा सागर विठो लोभपर | माझा का विसर पडिला त्यासि ॥३॥
माहेरींची आस दसरा दिवाळी | बाहे ठेवुनि निढळ वाटे पाहे ॥४॥
सखे वारकरी पंढरीस जाती | निरोप त्या हाती पाठवीन ॥५॥
निर्बुजला नामा कंठी धरिला प्राण | करीतसे ध्यान रात्रंदिवस ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग