जया संतचरणी नाही विश
1560.
जया संतचरणी नाही विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥
संतचरणी मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥
घाला लोटांगण वण्दू पा चरण । तेणे समाधान होईल मना ॥३॥
एका जनार्दनी सत्संगावांचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥४॥
