भेटिलागी माझा फुटतसे
1569.
भेटिलागी माझा फुटतसे प्राण | काया वाचा मने जीवेंभावे ॥१॥
जया देखे तया पुसे हेंचि मात | के मज अनंत बोलावील ॥२॥
संतसमागमे दसरा दिवाळी | ठेवूनि निढळी बाहे सदा ॥३॥
सखे पंढरीचे येती वारकरी | आर्त निरंतरी त्यांचे पायी ॥४॥
नामा म्हणे ऐसे करी दंडवत आमुते पुनीत करी बापा ॥५॥
