निळोबाकृत चांगदेव चर
1564.
निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २)
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ।
निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥
नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी ।
आदित्रय जननी देवाचिया ॥२॥
जगदोध्दारालागी केला अवतार ।
मिरविला बडिवार सिध्दाईच ॥३॥
निळा शरणागत म्हणवी आपुला ।
संती मिरविला देऊनि हाती ॥४॥
