जननिये जिवलगे येवो प
1546.
जननिये जिवलगे येवो पांडुरंगे | शिणलो भेटि दे गे एक वेळा ॥१॥
आहे आहे हे कृपादृष्टी पाहे | येऊनिया राहे हृदयामाजी ॥२॥
वासनेच्या संगे शिणले माझे चित्त | विषयाचे आघात पडती वरी ॥३॥
नाही तुझी सेवा केली मनोधर्मे | संसार संभ्रमे भ्रांत सदा ॥४॥
नाही तुझे नाम गाईले आवडी | वाळली कुडी विविधता ॥५॥
नामा म्हणे आई धांवे लवलाही | बुडतो चिताडोही तारी मज ॥६॥
