आह्मी देतो हाका । का
1548.
आह्मी देतो हाका । का रे जालासी तू मुका ॥१॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥धृपद॥
आधी करू चौघाचार । मग सांडू भीडभार ॥२॥
तुका म्हणे शेवटी । तुम्हा आम्हा घालू तुटी ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही तुला इतक्या कळवळ्याने हाक मारतो तरीही तू आमच्या हाकेला " ओ " का बरे देत नाहीस ? हे नारायणा तू आमच्याशी काही बोलत नाहीस याचाअर्थ : तू क्रियाहीन आहेस. आधी आम्ही तुझ्याकडे चार चौघे पाठवून देऊ आणि तुझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू आणि तरीही तू नाही ऐकलेस तर मग आम्ही तुझी कोणतीही भीडभाड ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मग शेवटचा पर्याय आम्ही वापरू तो म्हणजे तुमचा आणि आमचा संबंधच आम्ही तोडून टाकू.
