अमृत गोडिये नाही भिन
1553.
अमृत गोडिये नाही भिन्नपण ।
प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥
अळंकार सोने काय ते वेगळे ।
डोळिया बुबळे वेगळिक ॥२॥
नभा अवकाशा कोण भिन्न करी ।
वस्त्रतंतुपरी देव भक्त ॥३॥
निळा म्हणे प्राण तोचि प्रभंजन ।
नव्हती ते भिन्न एकएका ॥४॥
