सर्वस्वासी मुकावे ते
1559.
सर्वस्वासी मुकावे तेणे हरीसी जिंकावे । अर्थ : प्राण जीवे देहत्याग ॥१॥
मोह ममता माया चाड चिंता । विषया कंदुव्यथा जाळूनिया ॥धृपद॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशाधडी ॥२॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यासी ॥३॥
तुका म्हणे याती अक्षरे अभिमान । सांडोनिया शरण रिघे संता ॥४॥
अर्थ :
ज्याला हरीला जिंकायचे आहे त्यानेअर्थ :, प्राण, जीव, देह सर्वाचा त्याग करावा. सर्व गोष्टीला जो मुकतो तोच हरीला जिंकू शकतो. मोह, ममता, माया, इच्छा, चिंता आणि विषय भोग, व्यथा जाळून लोकलज्जा, दंभ, अहंकार, मत्सर यांना देशोधडीला लावले. शांति, क्षमा, दया या मित्रांना विनंती करून चक्रपाणी हरीला बोलावून्या करिता मूळ पाठवावा. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही जातीचा, अक्षर अज्ञानाचा अभिमान टाकून द्या आणि संतांना शरण जावे.
