मुक्तपण आम्हा नको दे
1551.
मुक्तपण आम्हा नको देवराया | भेटी मज पाया पुरे बापा ॥१॥
चतुरपणाची नको मज चाड | प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥
खाय भिल्लिणीची फळे आवडती | काय त्याचे चित्ती दुजा भाव ॥३॥
भावापाशी देव उभा सर्वकाळ | खेचराने बळे दाखविला ॥४॥
नामा म्हणे मज सद्गुरूची मत्ता | आम्हामि मुक्तता नको बापा ॥५॥
