प्रकरण. २)
1566.
प्रकरण. २)
ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत ।
मग धरिला पृथ्वी हेत पलाटणी ॥१॥
उत्तरदक्षीण मानस करावे ।
तीर्था अवलोकावे आणि क्षेत्रा ॥२॥
प्रांतोप्रांती शिष्यसांप्रदाय आपुला ।
वाढवावा हा धरिला उददेश मने ॥३॥
मना आले तेथे समाधी बैसोनी ।
प्रगट व्हावे कजनी दुजीये स्थळी ॥४॥
सिध्दीसी खेळणे गगनेसी बोलणे ।
पवनेसी धावणे अदृष्यगती ॥५॥
सत्यवाचासिध्दी मनेजयसिध्दी ।
प्राणज्योबुध्दी निश्चयेसी ॥६॥
सर्वही पाहिले सवही शोधले ।
सर्व अभ्यासिले विदयाजात ॥७॥
वरिष्ठ सकळा व्याकरणी आगळा ।
गायनाची कळा सप्तस्वरी ॥८॥
नृत्य करु जाणे थैमाने संगीत ।
अनुकारे दावित हावभाव ॥९॥
दशावतार खेळे सोंगे नानापरी ।
विदया नाही उरी ठेवियली ॥१०॥
चौदाशें वरुर्षे काळाचा अतिक्रम ।
करुनि मठ आश्रम तप्तीतीरी ॥११॥
जेवी मोरासी सर्वांगी विछावरी डोळे ।
परी एक आंधळे दृष्टावीण ॥१२॥
तयापरी विदयासिध्दीचा सोहळा ।
परी अपरोक्ष आंधळा आत्मज्ञानी ॥१३॥
नेणे भक्तीप्रेम सुखाचे साधन ।
सीगे चढला मान सर्वज्ञेचा ॥१४॥
चौदांशे वरुषांचे सिध्द चांगदेव ।
स्वीकारिती भांव पूजकाचे ॥१५॥
विदयेचे मूळपीठ साधनी वरिष्ठ ।
स्वधर्मेकनिष्ठ व्रतधारी ॥१६॥
आरोग्य शरीर आंगी दिव्य कांती ।
नामे विराजती चतुर्दश ॥१७॥
चांगदेव चांगा वटेश्वर चांगा ।
चक्रपाणी चांगा चांगसिध्द ॥१८॥
शिवयोगीचांगा मणीसिध्दचांगा ।
अनकरचांगा नाहमानामे ॥१९॥
मागेश नामे चांगा ।
सत्येसिध्द चांगा निश्चळदास ॥२०॥
चिंधादेवी चांगा म्हणवी बुटीचांगा ।
चौदानामे चांगा वर्तामान ॥२१॥
राजे प्रजालोक अनुग्रहीत झाले ।
विदया अभ्यासिले बहुसाल ॥२२॥
सिध्दीचा साधक वास तप्तीतीरी ।
पुजिती नरनारी भावयुक्त ॥२३॥
नित्य नूतन यात्रा येउनी लक्षावत ।
पावोनी मनोरथ फिरोनी जाती ॥२४॥
वसविले बाजार भोवते सवदागर ।
विकिताती संभार केणीयाचे ॥२५॥
त्रिकाळ पूजन त्रिकाल भोजन ।
करिती शिष्यजन आरतीया ॥२६॥
तव आला अतिथी पांथीक व्दिजवर ।
सांगे समाचार पैठणींचा ॥२७॥
देखीले अपूर्व चरित्र लोचनी ।
विस्मय तो मनी नित्य वाटे ॥२८॥
म्हणे जी सिध्दिराया नवलाची वर्तले ।
प्रतिष्ठानी देखिले सर्व जनी ॥२९॥
म्हैशीपुत्रामुखे बोलविल्या श्रुती ।
येउनी बाळमूर्ति महासिध्द ॥३०॥
आणूनि स्वर्गवासी पितर जेवविले ।
ते पुढती बोळविले निजस्थाना ॥३१॥
ते ऐकोनिया सकळही धि:कारिती त्यासी ।
म्हणती जाला यासी बुध्दीभ्रंश ॥३२॥
कैसा हा बोलीयेला भयचि न धरिता
अजागळी वार्ता अघटीतची ॥३४॥
म्हणती या मूर्खासी भोवंडा बाहेरी ।
पिशाच निर्धारी बरळे भलते ॥३५॥
तव तो म्हणे स्वामी निजनेत्री देखिले ।
आणि तुम्हा हे वाटले मिथ्या वाक्य ॥३६॥
तव सिध्द म्हणती त्यासी येऊनिया जवळी ।
सांगावी समुळी वितली कथा ॥३७॥
न वाटेचि हे सत्य अनुमाने सांगता ।
केवी झाला वदता पशू मुखे ॥३८॥
काय त्यांची नांवे जीही बोलवीला ।
म्हैसा पढविला निगमे केवी ॥३९॥
तरि तो म्हणे स्वामी परिसावे सादर ।
सांगेन सविस्तर वर्तमान ॥४०॥
तेथे चौघेंजणे बाळे अकस्मात आली ।
अंगी विराजली योगमुद्रा ॥४१॥
प्रायश्चितालागी आली तया स्थळा ।
परि दाखविली लीळा असुमाई ॥४२॥
निवृती ज्ञानदेवा सोपान मुक्ताई ।
नांवाची नवाई विप्री केली ॥४३॥
सातवे वरुष विरजे निवृत्ती ।
साहा वरुषांची मूर्ति ज्ञानेश्वर ॥४४॥
पांचवे वरुष सोपानदेवासी ।
बाळके म्हणती नानीरगोंडी ॥४६॥
म्हणविती पतीत नाही वडीलधारे ।
पातित्य कवण्या व्दारे पुसावयासी ॥४७॥
तव ते म्हणती स्वामी धाडिले ब्राम्हणी ।
तीही दिधले लिहूनि सविस्तर ॥४८॥
मग त्या दाविती वंशावळी पत्रिका ।
आणि म्हणती कीजो रंका पावन आहमां ॥४९॥
पत्र ते वाचिती सादर मानसे ।
ऐकती विन्यास विप्रकुळे ॥५०॥
आपेगावकर गोविंदपंत निराई ।
आणि सिदोपंत गिरजाई आळंकापुरी ॥५१॥
ते श्रीगैरनीनाथाची शुध्द सांप्रदायी ।
परी येरयेरा नाही परिचय कदा ॥५२॥
त्या गोविंदपंता उदरी वंशाचा उध्दार ।
उपजला कुमर विठ्ठल नामे ॥५३॥
केला व्रतबंध पढविला अक्षर ।
वेदातादि सारसांख्ययोग ॥५४॥
परमार्थिक ग्रंथ पाहिले गुरुमुखे ।
अध्यात्मी निजमुखे विराजला ॥५५॥
परम विरक्त ज्ञानाया सात्विक ।
ब्रम्हचर्य निष्टंक व्रत चाळी ॥५६॥
मातृपितृभक्त परम सुशीळ ।
नेदी अहंतामळ लागो अंगी ॥५७॥
परी जावे रामेश्वरा उत्कंठीत मनी ।
मग तीर्थरुपा पुसोनि निघते झाले ॥५८॥
ब्रम्हचर्य व्रत त्रिकाळ साधन ।
स्त्रानअर्ध्यदान करित चाले ॥५९॥
गोदा उभय तीरे अवलोकिली ।
पुढे चाली भीमातीरे ॥६०॥
मधुकरभिक्षा अनुतापे अथीला ।
तो आळंकापुरा आला अकस्मात ॥६१॥
तंप तेथे गिरजाई होते सिदोपंत ।
परम भागवत स्वधर्मशीळ ॥६२॥
तीही विठोबाची देखोनिया स्थिती ।
कन्या दिधली हाती संकल्पुनी ॥६४॥
करुनिया लग्न शुध्द कन्यादान ।
केली समर्पण रुक्माई त्या ॥६५॥
मग ते तीर्थवासु गेल रामेश्वर ।
करुनिया इतरा दक्षिण तीर्था ॥६६॥
सवेची तेथुनी गेले वाराणसी ।
तव ऐकिले वार्तेसी गाविचीये ॥६७॥
गयावर्जनाचा श्रीगोविंदप्रतासी देवआज्ञा झाली ।
मग उत्तरकार्य करुनी गयेसी गेले ॥६८॥
गयावर्जनाचा संपादिला विधी ।
जाले शुध्दबुध्दी विरक्ती बळे ॥६९॥
ऋणत्रयापासुनी झाला तोहि मुक्त ।
मग आले ते पुनरक्त महाक्षेत्रा ॥७०॥
विरक्त मानसी अनुतापाचे बळ ।
वैराग्य निर्मळ अंतरनिष्ठ ॥७१॥
मठी नृसिंहाश्रमासी जाऊनिया शरण ।
केले विसर्जन गृहस्थाश्रमा ॥७२॥
सर्व प्रायश्चिते केला प्रषोच्चार ।
नशिले विकार साही वैरी ॥७३॥
पूर्व आश्रमाचे त्यागूनिया नाम ।
जाले चैतन्याश्रम सतीधर्मे ॥७४॥
शिरी नारायण उदरी नारायण ।
गायात्री नारायण सर्व संधी ॥७५॥
जनी नारायण विजनी नारायण ।
वंदनी नारायण सर्वकाळ ॥७६॥
सद्गुरुसेवनी राहीले सतत ।
ते ऐकिीयेली मात सिदोपंती ॥७७॥
करुनिया खेद उभय दंपत्य ।
ह्रदयी रुक्माईते आलिंगिती ॥७८॥
म्हणती सर्वोविसी तुझे वो अनहीत ।
आम्हीचि ते नेणत केले मूर्खी ॥७९॥
पांथिाक विरक्त आला तीर्थवासु ।
तो देखोनिया उदासू दिधले तुज ॥८०॥
होणार ते बळीवंत होऊनिया गेले ।
पूर्वार्जिता न चले काही ॥८१॥
जिता अन्न तुज देऊ चीर चोळी ।
तुंचि आमुचे कुळी कन्यापुत्र ॥८२॥
यावरी तुळसीवृंदावनी पूजन ।
करुनि प्रदक्षिणा सारी काळ ॥८३॥
मग तेचि दृढ व्रत धरियेले रुक्माई ।
नेणे दुजे काही सेवेवीण ॥८४॥
तव नृसिंहाश्रमासी निजस्वप्नी दृष्टांत ।
झाला अकस्मात महाक्षेत्री ॥८५॥
चैतन्याश्रमासी आहे भार्या घरी
पतिव्रता माहेरी मार्ग लक्षी ॥८६॥
तरी तुम्ही जाऊनिया आणावी ते येथे ।
आणी दयावे संन्याशाते तिचिये हाती ॥८७॥
उभयता एकत्र नांदवावी ऐक्ये ।
जव होती बाळके चौघे पोटी ॥८८॥
इंद्रायणीतीरी आहे ते सुंदरा ।
माजी आळंकापुरा प्रतिव्रता ॥८९॥
तरी तुम्ही अनुमान न करिता सदथी ।
जावे शीघ्रगती आणवी ते ॥९०॥
मग नृसिंहाश्रम आले आळंकापुरासी ।
आणी नेले वाराणसी सिदोपंत ॥९१॥
गिरजा बाई सवे रुक्माबाई घेतली ।
त्या उभया भेटी केली वधुवरा ॥९२॥
आज्ञापिले तेव्हा चैतन्याश्रमासी ।
रहावे सहवासी स्त्रियेचिये ॥९३॥
जव चवघे अपत्ये होती ईचे कूसी ।
तव तुहमी उदासी नये होऊ ॥९५॥
दंड कमंडलु घेतला हाती ।
आणि केला उभयतांचा मेळा पाक ॥९५॥
करुनिया यात्रा आले आळंकापुरासी ।
कन्या जामातेसी सिदोपंत ॥९६॥
त्या देखोनि प्रांती उपहासिले बहूत जनी ।
म्हणती याते नयनी पाहो नये ॥९७॥
संन्यासी होऊनी भाग्येशी संबध ।
स्वप्नी हे निषिध्द न देखावे ॥९८॥
वनिता आणी घरी आणि बाहेरी संन्यासी ।
आतळता यासी प्रंत्यवाय ॥९९॥
कामलोभी तरी का झाला संन्यासि ।
नेले पूर्वजांसी अध:पाता ॥१००॥
हरिले शिखा सूत्र वर्ण याति गोत्रा ।
ग्रहदारादी सर्वत्र त्यजूनिया ॥१॥
आणी घेऊनिया पत्नी पहुडे हा शेजेसी ।
पापात्मा संन्यासी पापरुपी ॥२॥
विटाळ मानिती सर्वही दर्शनाचा ।
म्हणती हा पतीतांचा शिरोमणी ॥३॥
बुडविले स्वधर्म चतुर्थश्रमासी ।
इहलोक परत्रासी आंचवला ॥४॥
विटंबिली काया नासीला परमार्थ् ।
वेदबाह्य अनर्थ केला येणे ॥५॥
धिक् ऐसे जिणे म्हणती स्त्रियाबाळे ।
नेली उभय कुळे निरयवासा ॥६॥
उबगोनी षटकर्मा त्याजिले शिखासूत्र ।
आणि अपंगिले कलत्र परिग्रहो ॥७॥
परि तो कोणासीहि न बोले वचन ।
सर्वदा लपोन वसे गुंफे ॥८॥
नैवेदय वैश्वदेव नाही स्मार्ताध्यान ।
श्राध्द ब्रम्हयज्ञ विवर्जित ॥९॥
तयाची संतती मुले चौघें जणे ।
प्रायश्चित कोणे कैसे दयावे ॥१०॥
वडील निवृत्तह दुजा ज्ञानदेवो ।
तिजा सोपानदेवो मुक्ताबाई ॥११॥
वाचिलीया पत्र हासती सकळ ।
म्हणती यातिकुळ नाही यांसी ॥१२॥
नव्हते जे ऐकिले ते नेत्री देखिले ।
अपूर्व ही मुले श्रीपादाची ॥१३॥
चतुर्थाश्रम आणि भार्येसी संबध ।
ऐकता हे निषिध्द घडती दोष ॥१४॥
ठेवियेली नांवे बरवी विचारुनी ।
केली उपजवोनी पतित पोरे ॥१५॥
ज्ञानदेवा अर्थे ज्ञानाचा दिवस ।
आणि होता पतित वेष बाळकाचा ॥१६॥
यातिचिये पोटी जन्मले पतीत ।
नामे विपरीत ठेवियेली ॥१७॥
जेवि छत्रपति म्हणती घरींच्या बाळका ।
परी कैचा गज सिक्का राज्या त्यासी ॥१८॥
निवृत्ति नाम आणि प्रवृत्ति बांधला ।
सोपान अवघडला प्रत्यवाई ॥१९॥
मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी ।
ज्ञानदेवो आणि पातित्य भोगी ॥२०॥
तव एक म्हणती होता नामापासी काय ।
राजा आणि वाहे मोळया शिरी ॥२१॥
रवी नाम आणी दधी मंथन करीत ।
फणी विचंरीत वनित वनिता केश ॥२२॥
इंद्रधनुष्य आणि क्षणामात्रेंची विरे ।
मेरु आणि फिरे माळेसवे ॥२३॥
पैल तो गे म्हैसा पखाले वाहती ।
आणि र्याना तया म्हणती विश्वजनी ॥२४॥
म्हैसीपुत्र आणि नामे म्हणती ग्याना ।
तरी काय तो हाईन प्रज्ञाशीळ ॥२५॥
हे ऐकोनि ज्ञानदेव बोलती तयांसी ।
होती ज्ञानरासी आत्मा माझा ॥२६॥
आज्ञानासी ठावो नाहीची पाहता ।
विचारावे आता देईल साक्ष ॥२७॥
म्हणती व्दिज हे पूर्णाची बोलणी ।
बोलती वायाणी मूर्खे पोरे ॥२८॥
उपवासी उदार देती णाल्या ऐसे ।
परि ते फोस कजैसे भुकेल्याचे ॥२९॥
श्रीपाद बोलता ऐकिली जी वचने ।
तेची धरुनि मने बैसली हे ॥३०॥
कुपथ्य हे यासी झाले सर्वोपरी ।
प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा ॥३१॥
वासुदेव सर्वाभूती हे बोलती ।
परी बहुत जन्माते प्रतीती ज्ञाननिष्ठे ॥३२॥
शुका सनकादिकाचे हे स्वानुभव
पावती मानव कैशापरी ॥३२॥
शुका सनकादिकाचे हे स्वानुभव ।
पावती मानव कैशापपरी ॥३३॥
शब्दज्ञानी सर्वहि कथनी हेचि कथिती ।
परी तैसा न पवती स्वानुभव ॥३४॥
ऐशा करुनिया खीक्या धि:कारे बोलती ।
नाश केला म्हणती वृथा ज्ञाने ॥३५॥
पुसा यासि कैसा तुझा आत्मा पशू ।
हा दावी सौरसु बोलिल्याचा ॥३६॥
त्याचीया ताडणे तुज येती वेदनपा ।
की पावसी घातना त्याच्या घाते ॥३७॥
हा दाविशी चमत्कार तरी तू ज्ञानेश्वर ।
ऐसे व्दिजवर बोलियेले ॥३८॥
म्हणती ज्ञानदेव संदेह निरसावा ।
म्हैसा आणवावा जवळीके ॥३९॥
मग आणूनि टोणगा मारिती शिपुटी ।
तव तोचि उठी ज्ञानदेवा ॥४०॥
देखोनि आश्चर्य येरयेरा दाविती ।
आसुमाई हे म्हणती नवल थोर ॥४१॥
बोलिल्या सारखी कर्तृत्वाची शक्ती ।
आंगी तोचि विभूति ईश्वराची ॥४२॥
उदंडे बोलतो हावभाव दाविती ।
परी ते प्रतिष्ठाची मिरविती ॥४३॥
आजी हे अपूर्व देखिले लोचनी ।
जे परदु:ख लेऊनि दाविले अंगी ॥४४॥
तव ते कुटील म्हणती हे सर्व ही बाजीगिरी ।
दावितीती परी विदयाचिया ॥४५॥
गौड बंगाली हे विदया प्रसिध्द ।
शिकवूनि प्रबध्द केली पोरे ॥४६॥
चतुर्थाश्रमांत करिती तीर्थाटणे ।
शिकला टाणेटोणे क्रियाभ्रष्ट ॥४७॥
पतीत संन्यासी पत्तिताचे मंत्र ।
पढविले अपत्रि अर्भकासी ॥४८॥
सर्वाविशी तेणे नाश केला यांचा ।
जे प्राश्चित वाचा न वदे श्रुती ॥४९॥
गुरु आज्ञेवरी हाकऊनि सोकाळ ।
लावियेला विटाळ चतुर्याश्रमा ॥५०॥
अभिचार पूजा कापटयाची बीजे ।
घोकविली बोजे मूर्खा पोरा ॥५१॥
या अर्भकासी थार नाही ऐसी केली ।
आणि उभकुळे नेली पतनव्दारा ॥५२॥
तव सात्विक प्रबुध्द बोलती तयांसी ।
नये गुणदोषी चित्त ठेवू ॥५३॥
दीक्षादानी ऐसे भासती लोचनी ।
पैशून्य वचनी काय काज ॥५४॥
न कळेचि महिमा कदाहि कोणचा ।
नये बोलो वाचा हेळसुनी ॥५५॥
जानकी स्वयंवरी श्रीराम बाळरुप ।
भंगूनिया चाप पर्णिली सीता ॥५६॥
बटूरुपी वामन तीन पादभूमी ।
मागोनि आक्रमी अवनी सर्व ॥५७॥
तैसाचि प्रल्हाद दैत्याचिया वंशी ।
झाला वैष्णवांशी अग्रगण्य ॥५८॥
मर्कट योनीसी जन्मला हनुमंत ।
प्रताप अध्दूत आंगी त्याचे ॥५९॥
घटामाजी जन्म आणि प्राशिला सागर ।
पहा तो व्दिजवर अगस्तीमुनी ॥६०॥
असो हे न झाके सुवर्ण कसवटी लाविता ।
भानू आच्छादिता अभ्रछाये ॥६१॥
याहिवरी यासी युक्ति एकी आहे ।
जेणे नि:संदेह फिटे भ्रांती ॥६२॥
जरी हा बोलवील पशु निजमुखे ।
तरी याचे श्रुतिके आत्मज्ञान ॥६३॥
तरी मानू म्हैसा याचा आत्मा खरा ।
करु परिहारा दोषमुक्त ॥६४॥
ऐकोनिया सकळ मानवले व्दिज ।
म्हणती हेचि वोज बरवी युक्ति ॥६५॥
येहवी पध्दती नाही ग्रंथांतरी ।
प्रायश्चित्तावरी वचन याच्या ॥६६॥
यतीधर्मामाजी पत्नी आपंगिली ।
नाही हे ऐकिली शिष्टाचारी ॥६७॥
कैचे प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरा ।
कीजे परिहारा दंडूनि दोषा ॥६८॥
न करवे सर्वथा याचा अंगिकार ।
बरवा हा विचार काढियेला ॥६९॥
वरी म्हणे निळा पुढीलीये प्रकर्णी ।
वेद घोषे वाणी गर्जेल पशू ॥७०॥
॥ इति श्री चांगदेव चरित्रे ज्ञानेश्वर जन्मकर्म निरुपणं व्दितिय प्रकरणं समाप्त ॥
निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)
संत निळोबा महाराज / संत निळोबाराय गाथा
निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)
