वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

चुकलिया ताळा । वाती

🙏 3. संत तुकाराम · ABH-080304 · अभंग क्र. १५४६

1546.
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळा ॥१॥
तैसे जागे करी चित्ता । काही आपुलिया हिता ॥धृपद॥
विक्षेपिले धन । तेथे गुंतलेसे मन ॥२॥
नाशिवंतासाठी । तुका म्हणे करिसी आटी ॥३॥

अर्थ :
एखादा हिशोब चुकला आणि तो हिशोब लवकर लागला नाही तर डोळ्यात तेल घालून तो हिशोब लावण्यात माणसे तल्लीन होतात. त्याच तल्लीनतेने आपले हित व्हावे याकरिता आपले चित्त जागे करावे. एखाद्या माणसाने जमिनीत धन पुरून ठेवले तर त्याचे पूर्ण चित्त त्या धना जवळ लागलेलो असते त्याप्रमाणे आपले चित्त हरीच्या ठिकाणी तल्लीन करावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे नाशिवंता साठी तुम्ही किती आटा आटी करतात मग अविनाश हरि साठी प्रयत्न का करत नाहीत ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग