कळिकाळ बापुडे नामापु
899.
कळिकाळ बापुडे नामापुढे दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे ॥१॥
ऐसे वर्म सोपे सांडोनी शिणती । वाया हीन होती हांव भरी ॥२॥
असोनिया देही फिरतीते वाया । वाउगाचि तया शीण होय ॥३॥
एका जनार्दनी आत्माराम देही । आसोनी न कळे कांही शिणती वाया ॥४॥
