वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

ज्यांचा विश्वास जडला

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089082 · अभंग क्र. ८९६

896.
ज्यांचा विश्वास जडला पायी ।
हरिवीण काही नेणती ॥१॥
त्याचा करी अंगिकार ।
निरसी अंधार ममतेचा ॥२॥
सत्यासत्य दाखवी तया ।
लावी आपुलीया निजसोई ॥३॥
निळा म्हणे ऐसे वर्म ।
सापडे सुगम एकनिष्ठा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग