वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

जयाचे दरुषण होताची द

🙏 4. संत नामदेव · ABH-081828 · अभंग क्र. ९०९

909.
जयाचे दरुषण होताची दुरुनी | सर्व जाय पळोनी पाप ताप ॥१॥
तीर्थासी पावन कलिमलछेदन | देवाचे कल्याण जयाचेनी ॥२॥
ते पाय सादृश्य देखिले आजि दृष्टी | याग सहस्र कोटी न तुकती ॥३॥
जयांच्या हृदयी वेदांचा निवास | शास्त्रे रहिवास केला होय ॥४॥
जयांच्या वचने देवपितर तृप्त | स्वाहा स्वधा होत ज्यांच्या मुखे ॥५॥
जोडोनिया कर विनवतो सोपान | निश्चये वचन द्यावे आम्हा ॥६॥
शेष उच्छिष्टा करावे विभागी | बटुपणालागी अधिकारी ॥७॥
अध्यात्मग्रंथ पाहती पैठणी | गीतासंबोधिनी जवळी असे ॥८॥
भोगावती स्नान कालिका दरुषण | वेदांत व्याख्यान परिमिती ॥९॥
धन्य हा सोपान धन्य ज्ञानदेव | धन्य निवृत्तीराय ब्रह्मरूप ॥१०॥
सांगती पुराण रात्री हरिकीर्तन | पैठणीचे जन वेधियले ॥११॥
तव काव्ययज्ञ जाला गृहस्थाचे घरी | पितर मंत्रोच्चारी आव्हानिले ॥१२॥
अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य | यासारिखे ब्राह्मण नाही कोणी ॥१३॥
उपनिषदभाग पढिन्नलो वेदांत | परि हे सामर्थ्य नाही आम्हा ॥१४॥
नाही ऐकिले णा कोठे वर्तले | सृष्टी तेचि आजि दृष्टी दाखविले ॥१५॥
पशुमुखे वेद दृश्य इतर लोक | थोर हे कवतुक दाखविले ॥१६॥
मिळोनि समस्त सोडियेले शास्त्र | विचारोनी पत्र लिहियेले ॥१७॥
हे परलोकीचे तारू देवत्रय कोणी | प्रायश्चित्त काय द्यावे कोणी ॥१८॥
लिहोनिया पत्र दिधले तया हाती | समस्तांसी निवृत्ती नमस्कारिले ॥१९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग