श्रीपाद म्हणती याच्य
901.
श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव | माझे पुण्य सर्व लया जाते ॥१॥
सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत | सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥
जाउनी वाराणसी मठी प्रवेशले | मग पाचारिले चैतन्यासी ॥३॥
तुझे कोणी होते सत्य सांग आता | अन्यथा बोलता उरी नाही ॥४॥
चैतन्ये चरणी ठेवियेला माथा | म्हणे त्यागुनी कांता आलो स्वामी ॥५॥
उठवोनी श्रीपादे दिधले आश्वासन | म्हणता करी पाणिग्रहण इचे आता ॥६॥
अविधी कर्माचे न धरावे भय | यासी आहे साह्य जगदीश ॥७॥
स्वदेशा जाऊनी करावा आश्रमु | सुखरूप स्वधर्मु चालवावा ॥८॥
श्रीपादे मस्तकी हात ठेवियेला | निरोप दिधला चैतन्यासी ॥९॥
