मने करूनि कुटिल उकलु
908.
मने करूनि कुटिल उकलुनि शृंगारे ।
ते लावण्याच्या अपारे पडिले वो माये ॥१॥
माझे कुटिळपण गेले कुटिळपण गेले ।
गोविंदे बोजाविले निजरूप वो माये ॥२॥
बापरखुमादेविवरू माझे कुटिळ फेडू आला ।
विटेवरी मालाथिला निजरूपे वो माये ॥३॥
अर्थ :
मनाच्या कुटीलपणाने म्हणजे मी देह आहे या विपरीत समजुतीने पुष्कळ शृंगार करून शरीर लावण्याच्या अपार अभिमानांत होते. अशा स्थितीत मला श्रीकृष्णाने आत्मस्वरूपाविषयी निजबोध केल्यामुळे मनाचा हा कुटिलपणा नाहीसा झाला. माझ्या मनाचा कुटीलपणा गेला, कारण गोविंदाने माझे निजस्वरूपाचा बोध दिला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल याने माझी विपरीत बुद्धी नाहीसी करून विटेवर असणारा जो श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी माझे स्वरूपाचा लय केला. असे माऊली सांगतात.
