वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

अवघे जन्म उत्तम । वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087589 · अभंग क्र. ९०९

909.
अवघे जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम ॥१॥
अवघे वदती नाम साचे । धन्य धन्य ते दैवाचे ॥२॥
संतसंग सदा । अवघा तया हाचि धंदा ॥३॥
अवघे वर्ण उत्तम । भेदाभेद नाही काम ॥४॥
अवघा एका जनार्दन । भेदाभेदाचें नाही कारण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग