वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

आजिवरी होते मी मोकाट

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074669 · अभंग क्र. ९१२

912.
आजिवरी होते मी मोकाट ।
तव डोळे फुकट मोडा तुम्ही ॥१॥
समर्थाचे अंगी पडले अवचिती ।
तुम्हा ऐसी किती चाळविली ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलाची घरवात जाले ।
जन्मवरी एकांत करूनी ठेले ॥३॥

अर्थ :
आजपर्यंत मी स्वैर असल्यामुळे लोकांना डोळे घालण्याची फुकट खटपट केली. खटपट करीत असता सहजच समर्थाच्या पदरी पडलें. तुमच्या सारखे भासणारे आजपर्यंत मी किती एक चाळविले. आता तुमच्या पदरांत पडल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांच्या घरादारांत मीच होऊन जन्मभर एकांत करून राहिले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग