वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

जानकीची शुद्धी करावय

🙏 4. संत नामदेव · ABH-081846 · अभंग क्र. ८९४

894.
जानकीची शुद्धी करावया गेला | हनुमंत उडाला जेथुनिया ॥१॥
आनंदभरित चालतसे मार्ग | हृदयी अनुराग आवडीचा ॥२॥
ते स्थान वंदुनी पावला गोकर्ण | हाटकेश्वरी स्नान करुनिया ॥३॥
आला कोल्हापुरा लक्षुमी दरूषणा | पंचगंगे स्नान करुनिया ॥४॥
प्रीतीचा संगम देखिला कऱ्हाटकी | थोर जाला सुखी अंतरीचा ॥५॥
कृष्णेचिया स्नाने कृतकृत्य जाला | माहुली देखिला संगम डोळा ॥६॥
आला आळकावंती हर्षयुक्त चित्ती | दिधले सिदोपंती आलिंगन ॥७॥
विठ्ठल अंतरी मातापिता पाहावी | आज्ञा म्हणे द्यावी सिदोपंता ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग