मातापिता घरी आहेती स
900.
मातापिता घरी आहेती समस्ते |वर्तमान तयाते श्रुत करू ॥१॥
कृपा करुनी यावे तुम्ही आश्रमासी | सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥
नेऊनी आश्रमा दिधले आसन | केले श्रुत वर्तमान सिदोपंती ॥३॥
अर्घ्य पाद्यपूजा भोजन सारिले | मग वर्तमान पुसिले सिदोपंती ॥४॥
श्रीपाद म्हणती रामेश्वरी भाव | तंव येथे हा अभिप्राय जाला ऐसा ॥५॥
आता फिरोनिया जाणे वाराणसी | घेऊनी रखुमाईसी तुम्ही यावे ॥६॥
